नवी दिल्ली, 5 एप्रिल : पॅन कार्ड (Permanent Account Number-PAN) आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करणं अतिशय आवश्यक आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 होती. या शेवटच्या तारखेपर्यंतही अनेकांनी पॅन कार्ड आधारशी लिंक केलेलं नाही. जर हे लिंक नसेल तर आता दंड भरुन लिंक करण्याची प्रोसेस करावी लागेल.
पॅन-आधार लिंक नसल्यास पॅन कार्ड निष्क्रिय केलं जाईल. परंतु अद्याप पॅन कार्ड धारकांच्या सुविधेसाठी आधारशी लिंक नसलेले पॅन कार्ड इतक्यात निष्क्रिय केलं जाणार नाही. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड अॅक्टिव्हेट असेल परंतु आधारशी लिंक नसलेलं पॅन कार्ड अनेक कामांसाठी स्वीकारलं जाऊ शकत नाही. त्यामुळे तारीख उलटून गेली असली, तरी पॅन-आधार लिंक करणं आवश्यक आहे.
30 जूनपर्यंत पॅन - आधार लिंक करण्यासाठी 500 रुपये दंड भरावा (Penalty For Linking PAN Aadhaar) लागेल. या तारखेनंतर दंडाची रक्कम वाढवून 1000 रुपये केली जाईल. सरकारी आकडेवारीनुसार, 24 जानेवारी 2022 पर्यंत 43.34 कोटी पॅन-आधार लिंक झाले होते. परंतु अनेकांनी अद्यापही हे काम केलेलं नाही. त्यामुळे सरकारने दंड भरुन ही काम करण्याची सुविधा दिली आहे.
असं लिंक करा PAN-Aadhaar -
- सर्वात आधी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in. वर जा.
- इथे Link Aadhaar पर्यायावर क्लिक करा. आता नवं पेज ओपन होईल.
- या सेक्शनमध्ये पॅन-आधार डिटेल्स टाकून तुमचं नाव आणि मोबाइल नंबर लिहा.
- त्यानंतर ‘I validate my Aadhaar details’ सिलेक्ट करा. त्यानंतर Continue वर क्लिक करा.
- आता रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल. तो OTP टाकून ‘Validate' वर क्लिक करा. त्यानंतर पेनल्टी अर्थात दंडाची रक्कम भरल्यानंतर पॅन कार्ड आधारशी लिंक होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card link, PAN, Pan card, Pan card online, Tech news