मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Nykaa IPO allotment: तुमच्या खात्यात शेअर्स आले की पैसे? अशाप्रकारे तपासा

Nykaa IPO allotment: तुमच्या खात्यात शेअर्स आले की पैसे? अशाप्रकारे तपासा

जर तुम्ही देखील नायका आणि नायका फॅशनची ऑपरेटर कंपनी  FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडच्या आयपीओसाठी (Nykaa IPO) अलॉटमेंट भरली असेल (GR Infra IPO allotment) तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

जर तुम्ही देखील नायका आणि नायका फॅशनची ऑपरेटर कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडच्या आयपीओसाठी (Nykaa IPO) अलॉटमेंट भरली असेल (GR Infra IPO allotment) तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

जर तुम्ही देखील नायका आणि नायका फॅशनची ऑपरेटर कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडच्या आयपीओसाठी (Nykaa IPO) अलॉटमेंट भरली असेल (GR Infra IPO allotment) तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: जर तुम्ही देखील नायका आणि नायका फॅशनची ऑपरेटर कंपनी  FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडच्या आयपीओसाठी (Nykaa IPO) अलॉटमेंट भरली असेल (GR Infra IPO allotment) तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. Nykaa IPO चे शेअरचे अलॉटमेंट पुढील आठवड्यात सोमवारी 8 नोव्हेंबर 2021 रोजी होण्याची शक्यता आहे. तुम्ही रजिस्ट्रारची वेबसाइट लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड किंवा बीएसईच्या वेबसाइट bseindia.com द्वारे शेअर्सची अलॉटमेंट तपासू शकता.

शेअर्सचे वाटप आणि लिस्टिंग कधी होते?

Nykaa शेअर्सचे वाटप सोमवार, 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ज्यांना हे शेअर्स मिळणार नाहीत, त्यांचे पैसे 9 नोव्हेंबरला रिफंड केले जातील. तर ज्यांना Nykaa चे शेअर्स मिळतील, ते त्यांच्या डिमॅट खात्यात 10 नोव्हेंबरपर्यंत दिसू लागतील. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 11 नोव्हेंबर रोजी BSE आणि NSE वर आहे.

हे वाचा-पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, इथे तपासा तुमच्या शहरातील Fuel Rate

काय आहे GPM?

बाजार तज्ज्ञांच्या मते, Nykaa चे अनलिस्टेड शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 630 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत. कंपनीची इश्यू किंमत 1085-1125 रुपये आहे. यानुसार, Nykaa चे शेअर्स रु. 1755 (1125+630) वर व्यवहार करत आहेत. Nykaa IPO इश्यूला तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी 81.78 वेळा सबस्क्राइब केले गेले.

BSE WEBSITE bseindia.com च्या माध्यमातून अशाप्रकारे तपासा अलॉटमेंट

-सर्वात आधी  https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकला भेट द्या

-यानंतर इक्विटीवर सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा

-त्यानंतर Issue Name (Nykaa IPO)  निवडा

हे वाचा-दहा वर्षात Ola कंपनी सुरु झाल्यापासून पहिल्यांदा नफ्यात, IPO ही आणण्याची तयारी

-याठिकाणी अ‍ॅप्लिकेशन क्रमांक,  DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा

-यानंतर सर्च बटनवर क्लिक करा

-सर्व तपशील भरल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन स्टेटस मिळेल

रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट

-सर्वात आधी तुम्हाला या kosmic.kfintech.com/ipostatus/ लिंकवर भेट द्यावी लागेल

-यानंतर ड्रॉपडाउन करून आयपीओचं नाव सिलेक्ट करा

-यानंतर DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा

-तुमच्याकडे अ‍ॅप्लिकेशन क्रमांक असेल तर तो टाइप करा

हे वाचा-तुम्ही खरेदी केलेलं Gold असली आहे की नकली, घरबसल्या असं तपासा

-आता  DP ID किंवा Client ID असेल तर NSDL किंवा CDSL पैकी तुमचा डिपॉझिटरी निवडा आणि तुमचा DP ID किंवा Client ID प्रविष्ट करा

-यानंतर Captcha सबमिट करा

-याठिकाणी तुम्हाला अलॉटमेंटची संपूर्ण माहिती मिळेल

-तुम्हाला शेअर मिळाला नसेल तर दोन दिवसात रिफंड मिळून जाईल

अशाप्रकारे मिळेल रिफंड

ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळालेले नाहीत त्यांचे पैसे खात्यात जमा केले जातील. ज्या गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यांना शेअर्स मिळालेले नाहीत, त्यांना परतावा देणे सुरू होईल. हा रिटर्नचा पैसा त्याच खात्यात येईल ज्याद्वारे तुम्ही गुंतवणूक केली आहे.

First published:

Tags: Investment, Savings and investments