नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : देशात पेट्रोल-डिझेल ऑल टाइम रेकॉर्ड हायवर आहे. इंधनदर कमी होण्याचं चिन्ह नाही. पेट्रोल-डिझेल रेट सतत वाढतो आहे. मागील जवळपास 30 दिवसांपासून इधंन दरात सतत वाढ होत आहे. वाढत्या इंधनदरात आज काहीसा दिलासा मिळाला आहे. आज बुधवारी 3 नोव्हेंबर रोजी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
मागील जवळपास एक महिन्यापासून इंधन दर सतत वाढता आहे. ऑक्टोबर महिन्यात 25 हून अधिक वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. दररोज 30 आणि 35 पैसे दराने वाढ होऊन ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 7.45 रुपये महागलं आहे. तर डिझेल 7.90 रुपयांनी वाढलं आहे.
चार महानगरात पेट्रोल डिझेल का भाव (Petrol Diesel Price on 3 November 2021) -
>> दिल्ली पेट्रोल 110.04 रुपये आणि डिझेल 98.42 रुपये प्रति लीटर
>> मुंबई पेट्रोल 115.85 रुपये आणि डिझेल 106.62 रुपये प्रति लीटर
>> चेन्नई पेट्रोल 106.66 रुपये आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लीटर
>> कोलकाता पेट्रोल 110.49 रुपये आणि डिझेल 101.56 रुपये प्रति लीटर
गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल-डिझेलचे दर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना (Oil Companies) देण्यात आला आहे. त्यामुळे तेल कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती वाढलेल्या असल्याने इंधन दरात वाढ होतेय. त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन असलेल्या रुपयाचं मूल्य कमी-जास्त होण्यावरही पेट्रोल-डिझेलच्या किमती अवलंबून असतात. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून लावला जाणारा कर, मालवाहतूक, डीलर शुल्क आणि डीलर कमिशन यांचाही समावेश पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होतो. या सगळ्यामुळे इंधनाच्या किमतीत मोठी वाढ होते.
असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर -
पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise