• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • OLA FY21 Result: दहा वर्षात Ola कंपनी सुरु झाल्यापासून पहिल्यांदा नफ्यात, IPO ही आणण्याच्या तयारीत

OLA FY21 Result: दहा वर्षात Ola कंपनी सुरु झाल्यापासून पहिल्यांदा नफ्यात, IPO ही आणण्याच्या तयारीत

Ola ची सुरुवात 2010 मध्ये भाविश अग्रवाल यांनी केली होती. ओला पुढील काही महिन्यांत इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे 1 अब्ज डॉलर उभारण्याची तयारी करत आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 नोव्हेंबर : शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी Ola ची कॅब सर्विस सवयीची झाली आहे. अॅपद्वारे कॅब सेवा (Ola Cab service) पुरवणारी भारतीय कंपनी ओलाने सुमारे दशकभरापूर्वी आपला व्यवसाय सुरू केला. मात्र दशकभरात प्रथमच त्यांनी नफा कमावला आहे. जपानच्या सॉफ्टबँक समूहाने गुंतवणूक केलेल्या कंपनीने मंगळवारी सांगितले की त्यांनी प्रथमच आर्थिक वर्ष 2021 मध्ये नफा कमावला आहे. Ola ने सांगितले की मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात त्यांचा ऑपरेटिंग नफा किंवा EBITDA (Earnings Before Interest, Taxes, Depreciation, and Amortization) 89.82 कोटी रुपये होती. तर मागील आर्थिक वर्षात कंपनीला 610 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग तोटा झाला होता. दिवाळीत Cryptocurrency तुम्हाला करेल मालामाल, जाणून घ्या कधी, कुठे करावी गुंतवणूक आणि तज्ज्ञांचा सल्ला लॉकडाऊन दरम्यान राईड-शेअरिंगसाठी कमी मागणीमुळे, कंपनीचा महसूल मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 65 टक्के कमी झाला. असे असूनही खर्चात कपात आणि कामगार कपातीमुळे ओलाला नफा नोंदवण्यास मदत झाली आहे. ओलाची सुरुवात 2010 मध्ये भाविश अग्रवाल यांनी केली होती. ओला पुढील काही महिन्यांत इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे 1 अब्ज डॉलर उभारण्याची तयारी करत आहे. ओलाने कार लिजिंग (Car Leasing) आणि इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) उत्पादन व्यवसायातही विस्तार केला आहे. दिवाळीत सोन्याची झळाळी वाढणार का? वाचा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं देशातील राइड-हेलिंग मार्केटमध्ये ओलाचा बहुसंख्य वाटा आहे. ऑस्ट्रेलिया आणि यूके सारख्या जागतिक बाजारपेठांमध्ये कंपनी आपली उपस्थिती वाढवत आहे. भारतात ओला कंपनी राइड-हेलिंग मार्केटमध्ये उबेर टेक्नॉलॉजीशी स्पर्धा करते.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: