नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : धनत्रयोदशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण तुम्ही जे सोनं खरेदी केलं ते असली आहे की नकली? काही सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या आपल्या सोन्याची, दागिन्यांची तपासणी करू शकता.
हॉलमार्क -
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
BSI App द्वारे असली सोन्याची ओळख करणं सोपं आहे. BSI ग्राहकांना विक्री होणाऱ्या दागिन्यांच्या क्वालिटीची तपासणी करतं. दागिने खरेदी करण्याआधी Hallmark तपासणं आवश्यक आहे.
पाण्याने तपासणी -
सोन्याची शुद्धता तपासण्याचा सोपा पर्याय म्हणजे त्याला पाण्यात चेक करणं. एका बादलीत सोन्याचे दागिने टाका. सोनं पाण्यात पूर्णपणे डुबलं, तर ते सोनं असली आहे. काही वेळ सोनं तरंगलं तर ते नकली असू शकतं. खरं सोनं लगेच पाण्यात डुबतं, तर नकली सोनं काही वेळ तरंगतं.
व्हिनेगर -
व्हिनेगरचे काही थेंब दागिन्यांवर टाका. रंगात काही बदल झाला नाही, तर सोनं असली आहे. रंग बदलला तर सोन्यात भेसळ असल्याचं किंवा नकली असल्याचं समजू शकतं.
लोह चुंबक -
लोह चुंबकाद्वारेही दागिने असली-नकली तपासता येतात. सोनं चुंबकाकडे आकर्षित होत नाही. परंतु ज्वेलरी चुंबकाकडे आकर्षित झाल्यास, त्यात इतर धातुची भेसळ असल्याचं समजेल.
नायट्रिक अॅसिड -
नायट्रिक अॅसिडद्वारे सोन्याची शुद्धता तपासता येते. दागिन्याचा अतिशय लहानसा कोपरा जरासा घासा. त्यानंतर त्यावर नायट्रिक अॅसिडचे थेंब टाका. नकली सोनं अॅसिडच्या संपर्कात आल्यास त्याचा रंग हिरवा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold prices today