मराठी बातम्या /बातम्या /मनी /National Pension Scheme: पत्नीच्या नावाने उघडा हे खातं, मिळवा दरमहा 45 हजार रूपयांपर्यंत उत्पन्न; वाचा कसं?

National Pension Scheme: पत्नीच्या नावाने उघडा हे खातं, मिळवा दरमहा 45 हजार रूपयांपर्यंत उत्पन्न; वाचा कसं?

कपिल सिब्बल हे देशातील अशा काही नेत्यांपैकी एक आहेत ज्यांची संपत्ती 100 कोटींहून अधिक आहे. 2016 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या संपत्तीचं एकूण मूल्य 212 कोटी रुपये आहे. यामध्ये सुमारे 14 कोटी रुपयांच्या ठेवी बँक खात्यात आहेत. तसंच, त्यांच्याकडे एकूण 3 लाख रुपये रोख रक्कम आहे.

कपिल सिब्बल हे देशातील अशा काही नेत्यांपैकी एक आहेत ज्यांची संपत्ती 100 कोटींहून अधिक आहे. 2016 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या संपत्तीचं एकूण मूल्य 212 कोटी रुपये आहे. यामध्ये सुमारे 14 कोटी रुपयांच्या ठेवी बँक खात्यात आहेत. तसंच, त्यांच्याकडे एकूण 3 लाख रुपये रोख रक्कम आहे.

National Pension Scheme: मृत्युनंतर पत्नी कुणावर अवलंबून न राहता तिला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळत राहावी, असं तुम्हाला वाटत असल्यास National Pension Scheme मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.

  मुंबई, 16 फेब्रुवारी: आपल्या कुटुंबासाठी आपण आयुष्यभर झटत असतो. आपण जिवंत असताना त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याकडे आपला जास्तीत जास्त कल असतो. पण यासोबतच आपल्यामागे त्यांना काही त्रास होऊ नये किंवा काही कमी पडू नये, यासाठीही आपल्याकडून गुंतवणूक केली जाते. तुम्हीही असाच विचार करत असाल तर या पेन्शन स्कीमबाबत नक्की वाचा. मृत्युनंतर पत्नी कुणावर अवलंबून न राहता तिला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळत राहावी, असं तुम्हाला वाटत असल्यास National Pension Scheme मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. ज्यामुळे तुमच्यानंतरही तुमच्या पत्नीला स्वावलंबी जगता येईल आणि दर महिन्याला नियमित उत्पन्न (Regular Income) मिळू शकेल.

  आपल्या पत्नीच्या नावे तुम्ही न्यू पेन्शन सिस्टम (NPS) खातं उघडू शकता. या अंतर्गत तुमच्या बायकोच्या वयाला 60 वर्षं पूर्ण झाल्यावर एकरकमी रक्कम तर मिळेलच सोबत दर महिन्याला पेन्शनरूपात नियमित उत्पन्नही मिळू शकेल. या अकाउंटमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही तुमच्या पत्नीला दर महिन्याला मिळण्याऱ्या पेन्शनची रक्कम किती अपेक्षित आहे हे ठरवू शकता. यामुळे तुमच्या बायकोला वयाच्या साठीनंतर आर्थिक बाबींसाठी कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही.

  हे वाचा-Shark Tank India : 13 वर्षांच्या मुलीनं तयार केला अ‍ॅप, गुंतवणूक झाली 50 लाखांची

  जाणून घ्या नवीन पेन्शन सिस्टम खात्याबाबत

  या खात्यासाठी गुंतवणूक (Investment) करणं खूपच सोपं आहे. फक्त 1,000 हजार रूपये गुंतवूनही NPS खातं उघडता येतं. न्यू पेन्शन सिस्टम (NPS) खात्यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वर्षाला असे पैसे जमा करू शकता. NPS खात्यातील रक्कमही वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. तसंच तुम्हाला हवं असल्यास या खात्याच्या नव्या नियमांनुसार बायकोच्या वयाच्या 65 व्या वर्षापर्यंतही हे NPS खातं चालू ठेवता येतं. सर्वांत विशेष बाब म्हणजे हे पेन्शन तुमच्या बायकोला तहहयात मिळत राहील.

  दरमहा 45 हजार रूपयांपर्यंत मासिक उत्पन्न कसं मिळेल?

  या खात्यातील गुंतवणुकीने दरमहा 45 हजार रूपयांपर्यंत उत्पन्न मिळवणं शक्य आहे. बायकोच्या वयाच्या 30 व्या वर्षी तुम्ही तिच्या नावे NPS खातं उघडून त्यात दरमहा 5000 रुपये गुंतवले. तर या गुंतवणुकीवर तिला 10 टक्के परतावा मिळाल्यास वयाच्या 60 व्या वर्षी तिच्या खात्यात तब्बल 1.12 करोड रूपये असतील. यापैकी जवळपास 45 लाख रूपये तर त्यांना मिळतीलच सोबत दरमहा 45,000 रुपयाच्या आसपास पेन्शनही मिळेल.

  हे वाचा-Investment Tips : PPF Account मॅच्युअर झाल्यानंतर तुमच्याकडे कोणते पर्याय असतात?

  या खात्याचं अकाउंट मॅनेजमेंट फंड मॅनेजरकडून केलं जातं. NPS ही केंद्र सरकारची सोशल सिक्युरिटी स्कीम (Social Security Scheme) आहे. जर तुम्ही या योजनेत रक्कम गुंतवली तर त्याची व्यवस्था प्रोफेशनल फंड मॅनेजर करतात. ही जवाबदारी प्रोफेशनल फंड मॅनेजर्सना केंद्र सरकारतर्फे दिली जाते. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणं अगदी सुरक्षित आहे. पण तरीही या योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेवर निश्चित ठराविक रिटर्नची गॅरंटी नसते. वित्तीय नियोजकांनुसार, NPS ने सुरूवातीपासून आत्तापर्यंत वर्षाला साधारण 10 ते 11 टक्के रिटर्न दिला आहे.

  अजून सोप्या भाषेत जाणून घ्या

  जसं आपण वर पाहिलं की, वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करायची. ज्याचा कालावधी 30 वर्षं असेल तर दरमहा 5,000 हजार रूपये भरावे लागतील. गुंतवणूकीवर मिळणारा अंदाजे परतावा 10 टक्के असेल. एकूण पेन्शन फंडाची रक्कम असेल 1,11,98,471 रूपये जी तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी काढता येईल. अॅन्युटी प्लॅन (Annuity Plan) खरेदी करण्यासाठीची 44,79,388 रूपये एवढी रक्कम असेल. अंदाजे अॅन्युटी दर 8 टक्के असून 67,19,083 रुपये एवढी रक्कम असेल. तर दरमहा मिळणारं पेन्शन 44,793 रुपये एवढं असेल.

  आपल्या बायकोच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. पण कोणतीही गुंतवणूक करताना त्याच्या अटी आणि संबंधित परताव्याबाबत नीट माहिती वाचून मगच ती गुंतवणूक करा.

  First published:

  Tags: Bank services, Finance, Money, Pension, Pension funds, Pension scheme, Pensioners