मुंबई, 15 फेब्रुवारी : दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक (Long Term Investment) करायची असेल, तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये (Public Provident Fund) गुंतवणूक करणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. त्याचा कालावधी 15 वर्षे आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत सुरक्षित मानले जाते. जर तुमचे पीपीएफ खाते मॅच्युअर होणार असेल तर तुमच्याकडे 3 पर्याय आहेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. पीपीएफमध्ये गुंतवणूक करताना जोखीम जवळपास शून्य आहे कारण ती सरकारच्या सिक्युरिटीखाली आहे. परंतु लॉक-इन कालावधीचा विचार केल्यास, कर-बचत (Tax Saving) प्रोडक्टमध्ये तो सर्वाधिक आहे.
खाते बंद करून पैसे काढा
पीपीएफ खाते बंद केल्यानंतर, पहिला पर्याय म्हणजे खाते बंद करून पैसे काढणे. यासाठी, तुमचे पीपीएफ खाते असलेल्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल. ज्यांना पैशाची तातडीची गरज आहे त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे.
LIC IPO : तुम्हीही एलआयसी आयपीओची वाट पाहताय? काय असेल इश्यू प्राईज? वाचा डिटेल्स
खाते वाढवणे
जर तुम्हाला खाते बंद करण्याची परवानगी द्यायची नसेल, तर गुंतवणूकदारांना ते आणखी 5 वर्षे वाढवण्याची सुविधाही दिली जाते. या 5 वर्षांच्या आत, तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही पैसेही काढू शकता. परंतु लक्षात ठेवा की खाते वाढवण्यासाठी तुम्हाला 1 वर्षापूर्वी फॉर्म भरावा लागेल. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फ्रेश डिपॉझिट करून खाते वाढवू शकता.
Paytm च्या शेअर नीच्चांकी पातळीवर, विजय शेखर शर्मांच्या संपत्तीत मोठी घट
खातं अॅक्टिव्ह राहतं
परंतु तुम्ही जर दोन्ही पर्याय निवडू शकत नसाल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण पीपीएफ खाते मॅच्युरिटीनंतरही सक्रिय राहते. मॅच्युरिटीनंतरही, पीपीएफ खाते 5 वर्षे सक्रिय राहते. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कागदपत्राची गरज नाही. यासाठी तुम्हाला कोणतेही योगदान देण्याची गरज नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Open ppf account