जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लॉकडाऊनमुळे अनेकांची नोकरी धोक्यात असताना या विद्यार्थ्याला मिळालं 41 लाखांच पॅकेज

लॉकडाऊनमुळे अनेकांची नोकरी धोक्यात असताना या विद्यार्थ्याला मिळालं 41 लाखांच पॅकेज

लॉकडाऊनमुळे अनेकांची नोकरी धोक्यात असताना या विद्यार्थ्याला मिळालं 41 लाखांच पॅकेज

देशात कोरोना व्हायरससारख्या महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची चाकं थांबली आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 मे: देशात कोरोना व्हायरससारख्या महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची चाकं थांबली आहेत. त्यामुळे अनेक नोकरदारांवर टांगती तलवार आहे. बहुतांश नोकरदारांच्या वेतनात मोठी कपात करण्यात आली आहे. अशातच एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. जामिया विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला सुमारे 41 लाख रुपये पॅकेजच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. प्रथम बत्रा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्रथम याला मायक्रोसॉफ्ट इंडियाने ही ऑफर दिली आहे. जामिया विद्यापीठात सध्या प्लेसमेंट सुरु आहे. हेही वाचा… भीषण अपघात: बसवर आदळली भरधाव कार, बड्या उद्योगपतीचा मुलगा जागेवरच ठार प्रथम बत्रा सध्या जामिया विद्यापीठात बी.टेक करत आहे. तो गाजियाबाद येथे नेहरू नगरात राहतो. जामिया विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग विभागात प्रथमला मिळालेलं हे आतापर्यंतचं सगळ्यात मोठं पॅकेज आहे. 12वीच्या परीक्षेत प्रथम यानं 90.4 टक्के गुण पटकावले होते. मायक्रोसॉफ्ट इंडियाने प्रथमला ही ऑफर कोरोना लॉकडाऊनच्या आधी दिली होती. आतापर्यंत 257 विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर… जामिया विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आतापर्यंत 52 नामांकित कंपन्यांनी 257 विद्यार्थ्यांना नोकरी ऑफर केली आहे. मायक्रोसॉफट इंडियाने बी.टेकने प्रथम बत्रा याला 41 लाख रुपये वार्षिक पॅकेजची तर बी.टेकची विद्यार्थिनी आभा अग्रवाल हिला प्रति महिना 80000 रुपये स्टायपेंडवर इंटर्नशिपची ऑफर केली आहे. हेही वाचा..  PM CARE फंडसाठी एवढी जाहिरात कशासाठी? 20 लाख कोटींच पॅकेज देणाऱ्या मोदींना सवाल या कंपन्यांमध्ये होऊ शकते प्लेसमेंट… जामिया विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अजीम यांनी सांगितलं की, जामियाच्या विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर देणाऱ्या कंपन्यांमध्ये सॅमसंग आरअॅण्डडी, सीमेंस, महिंद्रा कॉमविवा, वेदांता लिमिटेड, एनआयआयटी, एलअॅण्डटी लिमिटेड, अमेरिकन एक्सप्रेस, विप्रो टेक्नोलॉजीज, आयबीएम, एलअॅण्डटी कंस्ट्रक्शन, इनोवेसर, टीएफटी, स्प्रिंगबोर्ड, न्यूजेन टेक्नोलॉजीज, जिया सेमीकंडक्टर्स, टीसीएस, ओवायओ, एवीआयजेडवीए, फुजित्सु कंसल्टिंग, जेएलल कंसल्टिंग, अजीम प्रेमजी फाउंडेशन, शेयरिट, टीवी9, सीआयएनआयएफ ग्रुप, ऑपटम यूनाइटेड हेल्थ ग्रुप आदींचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात