नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या काळातील 10 वा तर सीतारामन यांचा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. थोड्याच वेळात हा अर्थसंकल्प अर्थमंत्री संसदेत सादर करतील. या अर्थ संकल्पापूर्वी तेल कंपन्यांनीही आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. या किमती तशाच आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, कच्च्या तेलाची किंमत पुन्हा एकदा 85 डॉलरच्या खाली आली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे 84.49 डॉलर आहे आणि डब्ल्यूटीआय क्रूड सुमारे 79.22 डॉलर प्रति बॅरल आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती आणि ते 88 डॉलरच्या आसपास पोहोचले होते.
मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे
हेही वाचा - Union Budget 2023 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटआधी घेतली राष्ट्रपतींची भेट
इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर -
गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
नोएडामध्ये पेट्रोल 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर आहे
लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे
पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आहे
जयपूरमध्ये पेट्रोल 108.54 रुपये आणि डिझेल 93.77 रुपये प्रति लिटर आहे
हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर आहे
हेही वाचा - Union Budget 2023 : बजेटसाठी 14 हजार 400 मिनिटांसाठी कैद, घर आणि कुटुंबापासून दूर होतात ही लोक
एलपीजीच्या दरात कोणताही बदल नाही -
साधारणपणे दर महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून एलपीजीच्या किमतीत बदल केला जातो. मात्र, यावेळी एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीत 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये इतकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget 2023, LPG Price, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Union Budget 2023