Home /News /money /

डेबिट-कार्डचे नियम बदलल्यानंतर ग्राहकांवर काय होणार परिणाम? वाचा सविस्तर

डेबिट-कार्डचे नियम बदलल्यानंतर ग्राहकांवर काय होणार परिणाम? वाचा सविस्तर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India - RBI) ने 1 ऑक्टोबरपासून ग्राहकांची सुविधा आणि सुरक्षा वाढवण्यासाठी क्रेडिट-डेबिट कार्डसंदर्भातील काही नियमात बदल केले आहेत.

    नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India - RBI) ने 1 ऑक्टोबरपासून ग्राहकांची सुविधा आणि सुरक्षा वाढवण्यासाठी क्रेडिट-डेबिट कार्डसंदर्भातील काही नियमात बदल केले आहेत. या बदललेल्या नियमानुसार क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना आंतरराष्ट्रीय व्यवहार, ऑनलाइन व्यवहार आणि कॉन्टॅक्टलेस कार्डवरून ट्रान्झॅक्शनसाठी वेगवेगळी प्रायोरिटी सांगावी लागेल. हे बदल आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शनशी संबधित आहेत. एटीएम, एनएफसी, पीओएस किंवा ईकामर्स या सुविधांसाठी ग्राहक कधीही त्यांचे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड चालू किंवा बंद करू शकतात. अर्थात जर तुम्हाला आवश्यकता नसेल तर विदेशी ट्रान्झॅक्शनसाठी एटीएममधून पैसे काढणे आणि पीओएस टर्मिनलवर शॉपिंग करणे याकरता परवानगी दिली जाणार नाही. उदा. एखादा ग्राहक एनएफसी सुविधा चालू किंवा बंद करू शकतो, ज्यामध्ये पिनशिवाय मर्यादा प्रति दिन 2000 रुपये आहे. नवीन कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर ग्राहक या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. यासंदर्भात SBI ने अशी माहिती दिली की, तुम्ही तुमच्या कार्डद्वारे इंटरनॅशनल खरेदीची सुविधा सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला 5676791 या क्रमांकावर INTL आणि पुढे तुमच्या कार्डवरील शेवटचे 4 अंक एसएमस करावे लागतील. (हे वाचा-Gold Silver Rates: महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागलं सोनं, वाचा काय आहेत नवे दर) India Lends चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव चोप्रा सांगतात की, 'या सुधारणेचे मुख्य कारण फसवणूक आणि दुरुपयोग थांबवणे हा असून ग्राहकांना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवता यावेत याकरता उत्तम पर्याय देणे हे आहे.' या सुविधेचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत. 1. आंतरराष्ट्रीय खर्चांचे व्यवस्थापन बर्‍याच आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स वेबसाइट्स व्यवहार पूर्ण करताना ना सीव्हीव्ही पिन मागतात ना ही ओटीपी पाठवतात. हे नवीन पाऊल उचलल्यानंतर एकतर आंतरराष्ट्रीय वापरावर प्रतिबंध लागेल किंवा खर्च मर्यादा निश्चित केली जाईल, जेणेकरून कोणताही गैरवापर होणार नाही. 2. कार्ड फसवणूक थांबेल ही कार्ड सुविधा वापरकर्त्यांना विविध प्रकारांद्वारे एटीएम, पीओएस आणि कार्डद्वारे व्यवहारावर मर्यादा घालण्याची परवानगी देत ​​असल्याने कार्ड चोरी आणि कर्जमाफी किंवा कार्ड स्किमिंग फसवणूकीमुळे होणारे नुकसान कमी होईल. (हे  वाचा-Silver Lake चे सह-गुंतवणूकदार करणार रिलायन्स रिटेलमध्ये 1,875 कोटींची गुंतवणूक) 3. आर्थिक शिस्त वाढविण्यात मदत होईल ही सुविधा ग्राहकांना त्यांच्या व्यवहाराच्या प्रकारानुसार खर्च वाढवू देतील. ग्राहकांच्या सोयीनुसार बदलता येऊ शकेल अशी मर्यादा ठरवून ती एखाद्या व्यक्तीला तिच्या एकूण खर्चातून सहजपणे ती वाढवू शकते. 4. क्रेडिट कार्ड मर्यादेवर कोणताही परिणाम होणार नाही या सुविधेचा कोणाच्या क्रेडिट कार्ड मर्यादेवर कोणताही परिणाम होणार नाही. कार्ड वापरणाऱ्याच्या मोबाइल अॅप किंवा नेट बँकिंग साइटवर लॉग इन करून कधीही खर्च मर्यादा किंवा निर्बंध बदलले जाऊ शकतात. नवीन सुविधेसह ग्राहक विविध व्यवहारांवर मर्यादा सेट करण्यास सक्षम असतील.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Rbi

    पुढील बातम्या