Home /News /money /

Gold Silver Rates: महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागलं सोनं, चांदी 915 रुपयांनी उतरली

Gold Silver Rates: महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागलं सोनं, चांदी 915 रुपयांनी उतरली

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rates Today) 37 रुपयांनी वाढून 51,389 रुपयांवर पोहोचले आहेत.

    नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी दिल्लीमध्ये सोन्याचे भाव (Gold Rates Today) 37 रुपयांनी वाढले आहेत. दरम्यान चांदीचे दरात आजही घसरण पाहायला मिळाली. चांदीचे दर 915 रुपयांनी कमी होत झाले आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीज सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर 37 रुपयांनी वाढले आहेत. रुपयाचे मुल्य आज 63 पैशांनी वधारले आहे. गुरुवारी बाजार बंद होताना रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत 73.13 रुपयांवर स्थिरावले आहे. याचवेळी सकारात्मक देशांतर्गत इक्विटी आणि कमोजोर अमेरिकी डॉलर यामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत आहे. 1 ऑक्टोबर 2020 रोजी सोन्याचे दर  (Gold Price on 1st October 2020) सोन्याच्या दरामध्ये आज 37 रुपयांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली. यानंतर दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर 51,389 रुपयांवर पोहोचले आहेत. आधीच्या सत्रात हे दर 51,352 रुपये इतके होते. 1 ऑक्टोबर 2020 रोजी चांदीचे दर  (Silver Price on 1st October 2020) सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असली तरी चांदीचे दर आजही कमी झाले आहेत. प्रति किलो चांदीमध्ये आज 915 रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर चांदीचे भाव 62338 रुपये प्रति किलोग्रॅमवरून कमी होत 61,423 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. (हे वाचा-Silver Lake चे सह-गुंतवणूकदार करणार रिलायन्स रिटेलमध्ये 1,875 कोटींची गुंतवणूक) (हे वाचा-3 मित्रांनी 4 वर्षात प्रसिद्ध केला कॉफी ब्रँड, आहे कोट्यवधींची कमाई) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,895 अमेरिकी डॉलर प्रति औंस होते. तर चांदीचे दर 23.60 डॉलर प्रति औंस होते. पटेल यांच्या मते डॉलरच्या किंमतीत चढउतार सुरू असल्याने सोन्याचे दर आज वाढलेले पाहायला मिळाले. वायदे बाजारातील सोन्याचे दर एमसीएक्स एक्सचेंजवर आज चांदीची वायदे किंमत स्थीर होती. चांदी 60,680 रुपये प्रति किलो होती. सोन्याच्या वायदे किंमतीमध्ये आज कोणताही बदल दिसला नाही. सोन्याचे दर 50051 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत तेजी होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today, The gold

    पुढील बातम्या