मुंबई, 11 ऑगस्ट: टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) गोल्ड मेडल जिंकून नीरज चोप्राने (Neeraj Chopra gold medal) इतिहास रचला आहे. नीरजमुळे देशाला 121 वर्षांनंतर पहिल्यांदाच ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकता (India Olympics gold in athletics) आलं आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला मोठ्या प्रमाणात पुरस्कार आणि भेटवस्तू मिळत (Neeraj showered with gifts) आहेत. हरयाणा सरकार, पंजाब सरकार, रेल्वे, बीसीसीआय, आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्ज, महिंद्रा अशा अनेक सरकारी आणि खासगी क्षेत्रांतील संस्थांकडून त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होतो आहे.
नीरजला मिळणाऱ्या या पुरस्कारांमध्ये रोख रकमेचाही समावेश आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर या बक्षिसांमुळे नीरज कोट्यधीश (Neeraj Chopra prize money) झाला आहे. पण बक्षिसांची रक्कम ही त्याला पूर्णपणे मिळेल का? की त्यावरही त्याला टॅक्स (Tax on the prize money) द्यावा लागेल? तसं, झालं तर नीरजला हातात किती रक्कम मिळणार आहे? असे बरेचसे प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहेत.
दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिलं आहे. मीडिया अहवालानुसार, चार्टर्ड अकाउंटंट आनंद जैन यांनी अशी माहिती दिली आहे की, इन्कम टॅक्स कायद्याच्या सेक्शन 10(17A) नुसार (Income Tax Act), केंद्र आणि राज्य सरकारकडून एखाद्या खेळाडूला दिली जाणारी बक्षिसाची रक्कम ही पूर्णपणे करमुक्त (Government prize money tax free) असते. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने 2014 मध्येच ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना केंद्र किंवा राज्य सरकारकडून मिळणारे बक्षीस टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात, हा नियम केवळ पदक विजेत्या खेळाडूंसाठी आहे. संघातील इतर खेळाडू, किंवा प्रशिक्षक यांना सरकारकडून मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेवरही टॅक्स (Tax on government prize money) द्यावा लागणार आहे.
हे वाचा-'या' टीममधील भारतीय क्रिकेटपटू घेत आहेत लष्कराकडून प्रशिक्षण, पाहा VIDEO
सरकारव्यतिरिक्त इतर माध्यमातून मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेवर मात्र पदक विजेत्या खेळाडूलाही टॅक्स (tax on private prize money) द्यावा लागणार आहे. म्हणजेच, चेन्नई सुपर किंग्ज टीम, महिंद्रा यांच्यासारख्या खासगी कंपन्यांकडून मिळणाऱ्या बक्षिसांवर नीरजला 30 टक्के टॅक्स (30 percent tax on prize money) द्यावा लागणार आहे. इन्कम टॅक्स कायद्यानुसार, 50 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या बक्षिसांवर टॅक्स (prize money tax rules) लागू होतो. एकाच स्पर्धेत 50 हजारांहून अधिक किंमतीचे बक्षिस मिळाले, किंवा मग वर्षभरातील एकूण बक्षिसं मिळून त्याची किंमत 50 हजारांहून अधिक होत असेल, तरीही टॅक्स द्यावा लागतो.
हे वाचा-विनेश फोगाटवर बंदी! Tokyo Olympic 2020 दरम्यान या तीन नियमांचं केलं उल्लंघन
सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजला (Neeraj prizes from govt) हरियाणा सरकारकडून सहा कोटी रुपये, पंजाब सरकारतर्फे दोन कोटी रुपये, रेल्वेकडून तीन कोटी रुपये आणि मणिपूर सरकारतर्फे एक कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहे. तसेच, बीसीसीआयकडून एक कोटी रुपये, आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज टीमकडून (CSK Neeraj Chopra) एक कोटी रुपये आणि भारतीय ऑलिम्पिक संघाकडून 75 लाख रुपये देण्यात येणार आहेत. यासोबतच महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra Neeraj Chopra) यांनी नीरजला बक्षिस म्हणून ‘एक्सयूव्ही 700’ ही कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax, Olympics 2021, Tax, Tax benifits