जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'या' टीममधील भारतीय क्रिकेटपटू घेत आहेत लष्कराकडून प्रशिक्षण, पाहा VIDEO

'या' टीममधील भारतीय क्रिकेटपटू घेत आहेत लष्कराकडून प्रशिक्षण, पाहा VIDEO

'या' टीममधील भारतीय क्रिकेटपटू घेत आहेत लष्कराकडून प्रशिक्षण, पाहा VIDEO

क्रिकेटपटू मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर व्हावे यासाठी त्यांना भारतीय लष्कराकडून (Indian Army) प्रशिक्षण देण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑगस्ट : क्रिकेटपटू मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर व्हावे यासाठी त्यांना भारतीय लष्कराकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशननं (Cricket Association of Bengal) त्यांच्या अंडर 23 टीमला लष्करी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशननं याबाबतचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. यामध्ये खेळाडू लष्करी ट्रेनिंग घेत आहेत. ‘आम्ही लष्कराला क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्याची विनंती केली, ती त्यांनी तात्काळ मान्य केली’, अशी माहिती टीमचे कोच लक्ष्मी रतन शुक्लानं दिली आहे. अंडर 23 टीममधील संभाव्य खेळाडू दोन गटांमध्ये 10 दिवसांचं लष्करी प्रशिक्षण घेणार आहेत. टीम इंडियाचा माजी खेळाडू लक्ष्मी रतन शुक्लानं याबाबत बोलताना सांगितलं की, ’ मी आजवर खेळाडूंचे कौशल्य विकसित करण्याचं काम केलं आहे. पण त्यांना मानसिक आणि शारीरिक दृष्टीनं कणखर बनवणे देखील आवश्यक आहे. ही कणखरता त्यांना मैदानातील अवघड परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. खेळाडूंना कणखर बनवण्यासाठी भारतीय लष्करापेक्षा अधिक सक्षम कोण असेल?’ खेळाडूंसाठी अनेक नियम शुक्लाची मागील महिन्यात बंगाल अंडर 23 टीमच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्याने खेळाडूंना अनेक नियम लागू केले आहेत. यामध्ये सोशल मीडियापासून दूर राहणे तसंच लांब केस कमी करणे याचा समावेश आहे. त्याशिवाय टीममध्ये एकजूट कायम राहण्यासाठी सर्व खेळाडूंना बंगाली शिकणे देखील अत्यावश्यक आहे.

जाहिरात

लक्ष्मी रतन शुक्लानं आयपीएलमध्ये (IPL) कोलकाता नाईट रायडर्स (KKR), दिल्ली डेयरडेव्हिल्स (Delhi Dare Devils) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) या टीमचं प्रतिनिधित्व केलं. याशिवाय तो 3 आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांमध्येही टीम इंडियाकडून खेळला आहे. या 3 सामन्यांमध्ये त्याने 18 रन केले आणि 1 विकेटही घेतली. बंगालकडून त्याने 137 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 6,217 रन केले आणि 172 विकेट घेतल्या. तर 141 लिस्ट ए मॅचमध्ये त्याला 2,997 रन आणि 143 विकेट मिळवल्या. 80 टी-20 मॅचमध्ये शुक्लाला 991 रन करता आले आणि 47 विकेट मिळाल्या. मोठी बातमी! भारतीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल, रवी शास्त्री सोडणार टीम इंडियाची साथ शुक्ला याने तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. शुक्ला हावडा उत्तर मतदार संघातून आमदार झाला, यानंतर क्रीडा मंत्री म्हणूनही त्याने काम पाहिलं, पण यावर्षाच्या सुरुवातीला त्याने आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात