• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 2 वर्षात एका लाखाचे बनले 4 कोटी! 35 पैशांचा हा शेअर पोहोचला 146 रुपयांवर, तुम्हीही करू शकता गुंतवणूक

2 वर्षात एका लाखाचे बनले 4 कोटी! 35 पैशांचा हा शेअर पोहोचला 146 रुपयांवर, तुम्हीही करू शकता गुंतवणूक

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक शेअर्स (Flomic Global Logistics shares) भारतातील मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी एक आहे. या शेअरने चांगला परतावा दिला आहे

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा (Multibagger Return) दिला आहे. 2021 मधील मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीमध्ये केवळ स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप क्षेत्रातील दर्जेदार स्टॉकचा समावेश नाही तर पेनी स्टॉकचाही समावेश आहे. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक शेअर्स (Flomic Global Logistics shares) भारतातील मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी एक आहे. हा शेअर मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या यादीत समाविष्ट आहेत. या शेअरची किंमत ₹0.35 प्रति शेअरवरुन (BSE वर 28 मार्च 2019 रोजी बंद किंमत) ₹143.25 प्रति शेअरवर (BSE वर 12 नोव्हेंबर 2021 रोजी बंद किंमत) पोहोचली आहे. हा शेअर दोन वर्षांच्या कालावधीत जवळजवळ 409 पट वाढला आहे. काय आहे शेअरची प्राइस हिस्ट्री? या मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या (Multibagger penny stock) शेअर प्राइस हिस्ट्रीनुसार, फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअरची (Flomic Global Logistics share Price) किंमत गेल्या सहा महिन्यांत ₹7.62 वरून ₹143.25 पर्यंत वाढली आहे. या कालावधीत शेअरच्या किंमतीत जवळपास 1,780 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 मध्ये या शेअरने शेअरहोल्डर्सना सुमारे 7,245 टक्के परतावा दिला. गेल्या एका वर्षात, Flomik Global Logistics च्या शेअरची किंमत प्रति शेअर ₹1.22 वरून ₹143.25 प्रति शेअर झाली आहे, या कालावधीत सुमारे 11,640 टक्के वाढ नोंदवली आहे. हे वाचा-Petrol-Diesel: इंधनाचे नवे दर जारी, या शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षाही कमी दरम्यान बीएसईवर हा स्टॉक 28 मार्च 2019 रोजी 0.35 रुपयांच्या स्तरावर बंद झाला होता. आता हा स्टॉक  ₹143.25 च्या स्तरावर पोहोचला आहे. अर्थात या कालावधीमध्ये 40,830 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीत, या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने ₹ 216.30 चा उच्चांक देखील गाठला आहे. गुंतवणूकदारांचा झाला कोट्यवधींचा फायदा वरील प्राइस हिस्ट्रीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹ 18.80 लाख झाले असते. जर गुंतवणूकदाराने यामध्ये वर्षभरापूर्वी ₹ 1 लाख गुंतवले असतील आणि तर ही रक्कम आज ₹ 1.17 कोटी झाली असती. हे वाचा-खूशखबर! 6.47 कोटी लोकांच्या PF खात्यात आले व्याजाचे पैसे,तुम्ही बॅलन्स तपासला का त्याचप्रमाणे, जर गुंतवणुकदाराने हा शेअर ₹0.35 प्रति शेअरच्या पातळीवर असताना हा मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹1 लाख आज ₹4.09 कोटी झाले असते.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: