• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price Today: इंधनाचे नवे दर जारी, या शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षाही कमी

Petrol-Diesel Price Today: इंधनाचे नवे दर जारी, या शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षाही कमी

तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today)जारी केले आहेत. दरम्यान आज शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही (Fuel Price Today) बदल झालेला नाही आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today)जारी केले आहेत. दरम्यान आज शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही (Fuel Price Today) बदल झालेला नाही आहे. सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली होती. त्यानंतर गेल्या बऱ्याच कालावधीपासून दरांमध्ये वाढ झालेली नाही. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल साधारण 10 रुपयांनी कमी झालं होतं. दिवाळी दिवशी अनेक शहरात एवढी कपात पाहायला मिळाली होती. अनेक राज्यांमध्ये तर राज्य सरकारांनी देखील किंमती कमी केल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12-12 रुपयांनी कमी झालं आहे. शनिवारी पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल न झाल्याने आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. हे वाचा-पोस्टाची जबरदस्त योजना, अवघे 1500 रुपये प्रति महिना गुंतवणूक करुन मिळवा 35 लाख काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? >> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर >> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर या शहरांत 100 रुपयांपेक्षाही कमी आहेत पेट्रोलचे दर >> पोर्ट ब्लेयर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 87.01 रुपये प्रति लीटर >> ईटानगर पेट्रोल 92.02 रुपये आणि डिझेल 79.63 रुपये प्रति लीटर >> चंदीगड पेट्रोल 94.23 रुपये आणि डिझेल 80.9 रुपये प्रति लीटर >> आयजोल पेट्रोल 94.26 रुपये आणि डिझेल 79.73रुपये प्रति लीटर >> लखनऊ पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.8 रुपये प्रति लीटर >> शिमला पेट्रोल 95.78 रुपये आणि डिझेल 80.35 रुपये प्रति लीटर हे वाचा-'सेल्फ मेड' अब्जाधीश बनणं नव्हतं सोप! Falguni Nayar यांच्याकडून शिका या 4 गोष्टी >> पणजी पेट्रोल 96.38 रुपये आणि डिझेल 87.27 रुपये प्रति लीटर >> गंगटोक पेट्रोल 97.7 रुपये आणि डिझेल 82.25 रुपये प्रति लीटर >> रांची पेट्रोल 98.52 आणि डिझेल 91.56 रुपये प्रति लीटर >> शिलाँग पेट्रोल 99.28 आणि डिझेल 88.75 रुपये प्रति लीटर >> देहरादून पेट्रोल 99.41 आणि डिझेल 87.56 रुपये प्रति लीटर >> दमण पेट्रोल 93.02 आणि डिझेल 86.9 रुपये प्रति लीटर दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: