मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खूशखबर! 6.47 कोटी लोकांच्या PF खात्यात आले व्याजाचे पैसे, तुम्ही बॅलन्स तपासला का?

खूशखबर! 6.47 कोटी लोकांच्या PF खात्यात आले व्याजाचे पैसे, तुम्ही बॅलन्स तपासला का?

एम्प्लॉयी प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशनने (Employees’ Provident Fund Organization) अशी माहिती दिली आहे की, 6.47 कोटी पीएफ खातेधारकांना व्याजाचे पैसे पाठवण्यात आले आहेत.

एम्प्लॉयी प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशनने (Employees’ Provident Fund Organization) अशी माहिती दिली आहे की, 6.47 कोटी पीएफ खातेधारकांना व्याजाचे पैसे पाठवण्यात आले आहेत.

एम्प्लॉयी प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशनने (Employees’ Provident Fund Organization) अशी माहिती दिली आहे की, 6.47 कोटी पीएफ खातेधारकांना व्याजाचे पैसे पाठवण्यात आले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: जर तुम्ही नोकरदार वर्गातील असाल आणि तुमच्याही पगारातील रक्कम पीएफसाठी (Good News for PF account holder) कापली जात असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पीएफ खातेधारकांच्या खात्यात आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.50 टक्के दराने व्याजाचे पैसे पाठवण्यात आले आहेत. ईपीएफओने याबाबत माहिती दिली. एम्प्लॉयी प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशनने (Employees’ Provident Fund Organization) अशी माहिती दिली आहे की, 6.47 कोटी पीएफ खातेधारकांना व्याजाचे पैसे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही त्वरित तुमचे पीएफ खाते तपासा आणि व्याजाचे पैसे आले आहेत की नाही ते बघा. तुम्ही घरबसल्या पीएफ खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तपासू शकता.

PF खात्यातील बॅलन्स कशाप्रकारे तपासाल?

1. SMS च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलन्स- SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे.

हे वाचा-'सेल्फ मेड' अब्जाधीश बनणं नव्हतं सोप! Falguni Nayar यांच्याकडून शिका या 4 गोष्टी

2. Missed Call च्या माध्यमातून जाणून घ्या PF Balance- यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता.

3. Umang App च्या माध्यमातून- याकरता तुमचे उमंग App (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विस (employee-centric services) वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड (OTP) प्रविष्ट करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता.

हे वाचा-ATM आणि बँकिंग सेवेत समस्या आल्यास इथे करा तक्रार, त्वरित घेतली जाणार अ‍ॅक्शन

4. वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील शिल्लक- याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. त्यावेळी तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.

First published:

Tags: Pf, Pf news, PF Withdrawal