• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 6 रुपयांचा शेअर पोहोचला ₹188 वर, एका वर्षात दिला 3000% रिटर्न; गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 31 लाख

6 रुपयांचा शेअर पोहोचला ₹188 वर, एका वर्षात दिला 3000% रिटर्न; गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 31 लाख

JITF Infralogistics हा शेअर त्या मल्टीबॅगर पेनी स्टॉकपैकी एक आहे ज्याने गेल्या एका वर्षात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: शेअर मार्केटमधून (Investment in Share Market) गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत अनेकांनी चांगला रिटर्न मिळवला आहे. गेल्या एका वर्षात अनेक शेअर्सनी भागधारकांना 100% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. 2021 मधील मल्टीबॅगर शेअर्सच्या यादीत केवळ लार्ज-कॅप, मिड-कॅप किंवा स्मॉल-कॅप स्टॉकचा समावेश नाही तर पेनी स्टॉकचाही (Investment in Penny Stock) समावेश आहे. JITF Infralogistics हा शेअर त्या मल्टीबॅगर पेनी स्टॉकपैकी एक आहे ज्याने गेल्या एका वर्षात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. JITF Infralogistics च्या शेअरची किंमत प्रति शेअर ₹6.05 वरून ₹188 प्रति शेअर या स्तरापर्यंत वाढली आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने भागधारकांना 3,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. शेअर्समध्ये जोरदार वाढ या मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या शेअर प्राइस हिस्ट्रीनुसार JITF Infralogistics चे शेअर्स गेल्या एका महिन्यापासून प्रॉफिट बुकिंगच्या दबावाखाली आहेत. हा शेअर ₹261.50 वरून ₹187.95 प्रति शेअर पातळीपर्यंत घसरला आहे. या कालावधीत सुमारे 28 टक्के घट नोंदवली गेली आहे. गेल्या 6 महिन्यांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक ₹11.85 वरून ₹187.95 प्रति शेअर स्तरावर गेला आहे. या कालावधीत साधारण 1500 टक्क्यांची वाढ या शेअरने नोंदवली आहे. हे वाचा-SBI ATM Franchise: घरबसल्या सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा महिन्याला 60 हजार गेल्या काही वर्षात हा शेअर  ₹12.80 वरुन ₹187.95 च्या स्तरावर पोहोचला आहे. 2021 मध्ये या शेअरने 1370 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. गेल्या एका वर्षात, हा स्टॉक ₹ 6.05 (NSE वर 22 नोव्हेंबर 2020 रोजी बंद किंमत) वरून ₹ 187.95 (NSE वर 22 नोव्हेंबर 2021 रोजी बंद किंमत) वर गेला आहे. या कालावधीत 3000 टक्क्यांनी वाढ झाली. हे वाचा-क्रिप्टोकरन्सीवर बंदी येणार? हिवाळी अधिवेशनात मोठा निर्णय घेणार मोदी सरकार गुंतवणूकदारांचा झाला बंपर फायदा JITF इन्फ्रालॉजिस्टिक शेअर्सच्या किमतीच्या इतिहासावरून, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या काउंटरमध्ये ₹1 लाखाची गुंतवणूक केली असती, तर त्याचे ₹1 लाख आज ₹72,000 झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹ 16 लाख झाले असते. JITF इन्फ्रालॉजिस्टिक्सचे शेअर्स ₹12.80 प्रति शेअर या दराने खरेदी करून जर एखाद्याने 2021 च्या सुरुवातीला यामध्ये ₹1 लाखाची गुंतवणूक केली असती, तर , त्याचे ₹1 लाख आज ₹14.7 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, एखाद्या गुंतवणूकदाराने हा शेअर  ₹6.05 असताना खरेदी केला असता, त्याने यात केलेली 1 लाखाचे गुंतवणूक आज 31 लाख रुपये झाली असती.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: