Home /News /money /

SBI ATM Franchise: घरबसल्या सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा महिन्याला तब्बल 60 हजार रुपये; वाचा सविस्तर

SBI ATM Franchise: घरबसल्या सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा महिन्याला तब्बल 60 हजार रुपये; वाचा सविस्तर

तुम्ही एटीएम फ्रँचायझी घेऊन महिन्याला 60 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता

    मुंबई, 23 नोव्हेंबर: गेल्या काही काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, हजारो जण बेरोजगार झाले. व्यवसाय ठप्प झाले. या परिस्थितीमध्ये तुम्ही कमाईचा नवा मार्ग (Best 2nd source of Income) शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. घरबसल्या काम करून चांगली कमाई होऊ शकते, असा एक पर्याय सुचवत आहोत. स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फ्रँचायझी घेऊन तुम्ही (SBI ATM Franchise) चांगली कमाई करू शकता. एटीएम फ्रँचायझी (ATM Franchisee) हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. यासाठी तुमच्या घरामध्ये 50 ते 80 चौरस फूट जागा असणं आवश्यक आहे. अतिरिक्त खर्च न करता तुम्ही एटीएम (How to  take permission from SBI for ATM) फ्रँचायझी घेऊन महिन्याला 60 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. एटीएम फ्रँचायझी (SBI ATM Franchise) मिळवण्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाने निश्चित केलेले काही महत्त्वाचे निकष पूर्ण करावे लागतील. ते काय आहेत हे जाणून घेऊ या. आवश्यक कागदपत्रं अॅड्रेस प्रूफ म्हणून रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल जमा करावं लागेल. तसंच आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड (Aadhaar Card , Pan Card , Voter Card) जमा करावं लागतं. याशिवाय बँक खात्याचं पासबुक, फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर, GST क्रमांक, आर्थिक कागदपत्रं सादर करावी लागतात. पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी कमी होणार? केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारी महत्त्वाच्या अटी - एटीएम फ्रँचायझीसाठी (SBI ATM Franchise) निश्चित करण्यात येणारी जागा 50 ते 80 चौरस फूट असावी. तसंच आसपासच्या परिसरामध्ये 100 मीटरपर्यंत एकही एटीएम नसावं. - SBI ATM Franchise साठी निवडण्यात आलेली जागा तळमजल्यावर असायला हवी. - एटीएम जागेवर किमान 22 तास वीजपुरवठा असावा, तसंच 1 किलोवॉटची वीज जोडणी असावी. - या एटीएमची क्षमता दररोज सुमारे 300 व्यवहारांची असायला हवी. - या जागेवर एटीएम मशीन बसवण्यापूर्वी 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) घ्यावं लागतं. किती कमाई? कॅश ट्रान्झॅक्शन आणि नॉन कॅश ट्रान्झॅक्शनसाठी कमिशन निर्धारित आहे. कॅश ट्रान्झॅक्शनवर आपल्याला 8 रुपये, तर नॉन कॅश ट्रान्झॅक्शनवर 2 रुपये मिळतील. एटीएममध्ये जितके जास्त व्यवहार होतील तितकी कमाई जास्त होईल. एटीएममध्ये दररोज 250 व्यवहार होत असतील आणि त्यापैकी 65 टक्के रोखीचे आणि 35 टक्के नॉन-कॅश व्यवहार होत असतील, तर दर महिन्याला सुमारे 45 हजार रुपये कमावता येतील. एटीएममध्ये व्यवहार दुप्पट म्हणजेच 500 व्यवहार दररोज झाले, तर महिन्याला 90,000 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. निकषांनुसार दररोज 300 व्यवहार केले तर ही कमाई 60,000 रुपये होईल. Multibagger Stock : वर्षभरात अवघ्या 6 रुपयांचा स्टॉक 188 रुपयांवर कसा करावा अर्ज? एटीएम फ्रँचायझी देण्याबद्दलचा आदेश बँकेकडून जारी केला जात नाही. तसंच बँक तुम्हाला एटीएम सेट करण्यासाठी पायाभूत सुविधा देत नाही. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी कंपन्यांशी संपर्क साधावा लागेल. यासाठी बँकेच्या थर्ड पार्टी कंपन्या निश्चित आहेत. यात तीन कंपन्यांची नावे सर्वांत महत्त्वाची आहेत. एटीएम फ्रँचायजी मिळवण्यासाठी या कंपन्यांमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागेल. आवश्यक पात्रता पाहून तुम्हाला एटीएम फ्रँचायझी दिली जाते.
    First published:

    Tags: ATM, Money, SBI

    पुढील बातम्या