नवी दिल्ली, 25 एप्रिल : आजच्या काळात 80 रुपये ही अगदी छोटी रक्कम आहे. पण तो काळा साठच्या दशकाचा होता. 7 महिलांनी एकत्र येऊन एक उद्योग सुरु केला. त्या स्वत:च्या पायावर तर उभ्या राहिल्याच पण, त्यांनी महिला सशक्तीकरणातही मोठं योगदान दिलं. आत त्यांनी सुरू केलेल्या ब्रँन्डच्या 82 शाखा सुरू आहेत. लिज्जत पापड हे नाव कोणाला माहीत नाही. मध्यमवर्गीयांच्या घरातचं काय अगदी श्रीमंतांकडेही लिज्जत पापड आवडीने खाल्ले जातात. आज हा मिलेनियर ब्रँड बनलाय. करोडो रुपयांच्या कंपनीत रूपांतरित झालाय, त्याची सुरुवात मात्र, अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने झाली होती. आज या ब्रँडला 45 हजाराहून अधिक महिला जोडल्या गेल्यात. अगदी थोड्या भांडवलापासून सुरू झालेला हा उद्योग गेल्या अनेक दशकांपासून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करतो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आज या ब्रँडच्या 82 शाखा आहेत. (हे वाचा- गृह आणि वाहनकर्जावरील EMI वाढणार, नव्या आणि जुन्या ग्राहकांवर होणार असा परिणाम ) देशातल्या लोकप्रिय ब्रॅन्डबद्दल आम्ही बोलत आहोत. ज्याचे नाव आहे लिज्जत पापड. 15 मार्च 1959 मध्ये जसवंती बेन यांनी लिज्जत पापड या संस्थेचा पाया रचला. या ब्रॅन्डचं खास वैशिष्ट्य म्हणजे महिलाचं कौशल्य. त्यांच्याकडे काम करणार्या महिलांना शिक्षणाची अट नाही. त्यांच्याकडचं कौशल्य पाहून काम दिलं जातं. लिज्जत ब्रँड ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ या नावाने चालणारी एक सहकारी संस्था आहे. महिला सक्षमीकरणामध्ये कायम आघाडीवर असणाऱ्या या ब्रॅन्डची सुरुवात 7 महिलांनी अवघ्या 80 रुपयांच्या भांडवलासह मुंबईतच केली होती. पहिल्यांदा घराच्या छतावर पापडची 4 पाकिटे तयार केली गेली. पहिल्याच वर्षी पापड ब्रँडने 6 हजार रुपये कमावले. 2002 साली त्याचा टर्नओव्हर 10 कोटी रुपये झाला. 2018 साली या ब्रँडचा वार्षिक टर्नओव्हर 800 कोटी झालाय. (हे वाचा- गौरी नव्हे तर काजोलला समजत होता शाहरुख खानची पत्नी, वरुण धवनचा भन्नाट किस्सा ) या ब्रँडमध्ये केवळ महिलाच काम करता असं नाही तर, पुरुषही काम करतात. पण ते फक्त दुकानातील सहाय्यक आणि ड्रायव्हरसारख्या पदांवर. ब्रँडसोबत काम करणार्या महिला तिथल्या ब्रॅन्चमध्ये जाऊन पीठ आणि मसाल्यांचं ताजं मिश्रण घेऊन येतात. आपल्या घरी पापड तयार करुन आणतात. हे पापड त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखले जातात. ज्याचं श्रेय केवळ इथे काम करणाऱ्या महिलांनाच जातं. लिज्जतसोबत काम करणाऱ्या महिला कमीतकमी दर महिना 12 हजार रुपये कमावतात. (हे वाचा- दीड वर्षापासून बेरोजगार आहे आमिर खानचा हा सहकलाकार,हे देखील वर्ष असंच गेलं तर… ) कोरोनाच्या महाभयंकर संकटात लिज्जत पापडांच्या विक्रीवरही परिणा झाला आहे. कितीतरी कंपन्यांनी कर्मचारी कपात किवा पगार कपात केली आहे. पण या ब्रँन्डने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी केलेला नाही. तर पापडांची किंमतही वाढवलेली नाही 100 ग्रॅम पापडांची केवळ 31 रुपये किंमत आहे. आता सिंगापूरपासून अमेरिकेपर्यंत हे पापड पोहचले आहेत. लिज्जतची सक्सेस स्टोरी आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. या ब्रँन्डवर लवकरच सिनेमा येणार आहे. महिलांनी महिलांसाठी चालवेलेल्या या उद्योगाची स्टोरी आपण लवकरच रुपेरी पडद्यावर पाहणार आहोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.