मुंबई, 24 एप्रिल: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) वरूण धवन (Varun Dhawan)आज आपला 34वा वाढदिवस साजरा करत (Birthday Celebration) आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन (David Dhawan son) यांचा मुलगा असलेल्या वरुणने अनेक हिट चित्रपटांत काम केलं आहे. नुकतंच वरुणने आपली बालमैत्रीण नताशा दलालसोबत (Natasha Dalal) लग्नं सुद्धा केलं आहे. वरुण आपल्या अनेक मुलाखती दरम्यान अनेक किस्से सांगत असतो असाच एक किस्सा बॉलिवूड किंग शाहरुख खान (Shahrukh Khan)आणि काजोलच्या (Kajol) बाबतीत त्याने सांगितला होता.
वरुण धवन ज्यावेळी टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’ मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने आपल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. याच दरम्यान त्याने काजोल आणि शाहरुखचा किस्सा सांगताना म्हटलं होतं. 'मी एकदा कामानिमित्त शाहरुख सरांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी घराचं दार गौरी खान यांनी उघडलं होतं. त्यावेळी मला काही समजलं नव्हत मी खुपचं आश्चर्यचकित झालो होतो. कारण मला वाटत होतं की काजोलजी शाहरुख यांच्या पत्नी आहेत. मात्र मी घरी अल्यानंतर हा प्रकार आईला सांगितला की त्या ठिकाणी काजोलजी नव्हत्या. तर मला आईनं सांगितलं काजोल नव्हे तर गौरी शाहरुखची पत्नी आहे. आणि माझा गैरसमज दूर केला.' हा किस्सा ऐकून सर्वजण पोट धरून हसत होते. शाहरुखसुद्धा यावेळी मनसोक्त हसला होता.
View this post on Instagram
(हे वाचा: रश्मी देसाईचं बेडरूम फोटोशूट; हॉट फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ )
वरुणचं नव्हे तर लहानपणी अनेकांना हा गैरसमज होता की शाहरुख खानची पत्नी काजोलचं आहे. कारण या दोघांची केमेस्ट्रीचं इतकी उत्तम होती की कोणालाही सहजासहजी हा समज व्हायचा. 90च्या काळातील एक लोकप्रिय जोडी म्हणून यांना ओळखलं जातं. या दोघांची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. यांनी सोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
(हे वाचा: पुरुषांचे आणि स्त्रियांचे कपडे वेगळे का?'; अभिजीत खांडकेकरच्या या पोस्टची होतेय )
शाहरुख आणि काजोल या जोडीचा ‘दिलवाले दुल्हनिया ळे जायेंगे’ या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकोर्ड तोडले आहेत. आजही अशी काही चित्रपटगृहे आहेत, ज्या ठिकाणी हा चित्रपट अजून दाखवला जातो. यातील सिमरन आणि राजच्या जोडीने तरुणांना अक्षरशः वेड लावलं होतं. यातील प्रत्येक गाणं सुपरहिट झालं होतं. शाहरुख आणि काजोल या जोडीने बाजीगर, करण-अर्जुन, कुछ कुछ होता है, दिलवाले अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.