जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दीड वर्षापासून बेरोजगार आहे आमिर खानचा 'हा' सहकलाकार, हे देखील वर्ष असंच गेलं तर...

दीड वर्षापासून बेरोजगार आहे आमिर खानचा 'हा' सहकलाकार, हे देखील वर्ष असंच गेलं तर...

दीड वर्षापासून बेरोजगार आहे आमिर खानचा 'हा' सहकलाकार, हे देखील वर्ष असंच गेलं तर...

बॉलिवूड (Bollywood) असो किंवा छोटा पडदा (Television) असे अनेक कलाकार आहेत, जे कोरोनामुळे घरीचं आहेत. किंवा त्यांच्या शुटींग अडकून पडल्या आहेत. आणि काम नसधा आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 एप्रिल: सध्या देशासाठी खुपचं कठीण काळ सुरु आहे. एकीकडे कोरोनाचं संकट (Coronavirus) वाढत आहे. तर दुसरीकडे बेरोजगारी (Unemployment) वाढत चालली आहे. कोरोना महामारीने आतापर्यंत हजारों लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या आहेत. हिच परिस्थिती मनोरंजनसृष्टीत सुद्धा आहे. त्यामुळे बॉलिवूड (Bollywood) असो किंवा छोटा पडदा (Television) असे अनेक कलाकार आहेत, जे कोरोनामुळे घरीचं आहेत. किंवा त्यांच्या शुटींग अडकून पडले आहेत. काम नसल्यामुळे त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. असचं काहीसं झालंय आमिर खानच्या (Aamir Khan) मेला (Mela) या चित्रपटातील अभिनेता आयुब खान (Ayub khan) यांच्यासोबत. अनेक मालिका आणि मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केलेले आयुब खान हे गेल्या दीड वर्षांपासून घरी बसून आहेत. त्यामुळे ते अतिशय चिंताग्रस्त झाले आहेत. काम नसल्यामुळे त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. (हे वाचा- मुलासह आक्षेपार्ह फोटोशूट करणाऱ्या ‘त्या’ अभिनेत्रीला आता कोर्टाकडून मोठा दिलासा ) टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत आयुब खान यांनी खुलासा करत म्हटलं आहे. ‘मी गेल्या दीड वर्षापासून घरी बसून आहे. कोरोनामुळे मला एकही काम मिळालेलं नाही. तसेच त्यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे मला गेली दीडवर्ष काम मिळालेलं नाही. आणि हे जर असचं चालू राहिलं, तर मला उधार मागून काम चालवावं लागेल. मदत मागण्याशिवाय दुसरा कोणताचं पर्याय माझ्याकडे नाही. तसेच खूप महिन्यांपासून माझ्याकडे काही काम नसल्यामुळे मी माझ्या सगळ्या सेविन्ग्सही खर्च केल्या आहेत. (हे वाचा- कार्तिक आर्यनला डच्चू; आता खिलाडी अक्षय कुमारसोबत करण जोहरचा Dostana 2? ) अभिनेता आयुब खान सध्या आपल्या सेविन्ग्स मधून आपला उदरनिर्वाह चालवत आहे. त्यांच म्हणनं आहे की या परिस्थितीमध्ये काही करूही शकत नाही. असचं चालू राहिलं तर मला उधारीचा मार्ग अवलंबवा लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात