मराठी बातम्या /बातम्या /मनी /

गृह आणि वाहनकर्जावरील EMI वाढणार, नव्या आणि जुन्या ग्राहकांवर होणार असा परिणाम

गृह आणि वाहनकर्जावरील EMI वाढणार, नव्या आणि जुन्या ग्राहकांवर होणार असा परिणाम

file photo

file photo

अलीकडेच भारतीय स्टेट बँकेनं (State Bank of India) गृहकर्जाचे व्याजदर पाव टक्क्यानं वाढवले आहेत. तसंच बँकेनं आपली कमी व्याजदराची योजना आता बंद केली असून,कर्जाचे व्याजदर आता पूर्वीच्याच पातळीवर आले आहेत.

नवी दिल्ली, 24 एप्रिल: बहुतांश लोक घर (Home Loan) किंवा वाहन (Auto Loan) घेण्यासाठी कर्ज (Loan) घेतात. त्यांच्यासाठी व्याजदर अत्यंत महत्त्वाचा असतो. व्याजदरानुसार घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा दरमहा हप्ता (EMI) ठरत असतो. कर्जाचा हप्ता चुकला की दंडासहित हप्ता द्यावा लागतो. व्याजदर (Interest Rate) कमी झाला की, हप्ता कमी होतो आणि व्याजदर वाढला की हप्ताही वाढतो. त्यामुळे कर्जदारांसाठी कर्जाचा व्याजदर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आता कर्जाचे व्याजदर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अलीकडेच भारतीय स्टेट बँकेनं (State Bank of India) गृहकर्जाचे व्याजदर पाव टक्क्यानं वाढवले आहेत. तसंच बँकेनं आपली कमी व्याजदराची योजना आता बंद केली असून,कर्जाचे व्याजदर आता पूर्वीच्याच पातळीवर आले आहेत.

अन्य बँकांचे व्याजदरही वाढण्याची शक्यता

स्टेट बँकेपाठोपाठ आतादेशातील इतर बँकाही व्याजदर वाढीची घोषणा करण्याची शक्यता आहे.‘पैसा बाझार’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक नवीन कुकरेजा यांच्या मते, गृहकर्जाची विशेष योजना मागं घेतल्यानंतर नवीन लागू होणाऱ्या व्याजदरात पाव टक्क्याची वाढ असेल. मात्र याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होईल. कारण स्टेट बँकेनंतर इतर बँकाही आपले व्याजदर वाढवतील. अलीकडेच एचडीएफसी बँकेनं 29 महिन्यानंतर आपल्या मुदत ठेवींचे (Fixed Deposit) व्याजदर 10 ते 25 आधारभूत अंकांनी वाढवले आहेत. त्यामुळे त्यांच्या आवश्यक भांडवलाची गरज वाढली आहे. त्यामुळे बँक आता कर्जाचे व्याजदरही वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे कर्जदारांच्या कर्जाचा मासिक हप्ता वाढण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-LPG Gas Cylinder: 819 रुपयांचा गॅस सिलेंडर फक्त 19 रुपयांत; असा घ्या ऑफरचा फायदा)

नवीन ग्राहकांनी काय करावं?

व्याजदर वाढत असतील तर नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी फिक्स दरानं कर्ज घेणं फायदेकारक ठरतं. बँक बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांच्या मते,सध्या व्याजदर वाढत आहेत,त्यामुळे फिक्स दरानं गृह,वाहन किंवा अन्य कर्ज घेणं लाभदायी ठरेल. याचा व्याजदर कमी असतो. गृहकर्जासाठी नवीन ग्राहकांसाठी अधिक कोणतेही पर्याय नाहीत.कारण काही बँका फक्त फिक्स दरानेच गृहकर्ज देतात.

(हे वाचा-Gold Price Today: सोन्याच्या दराची 50 हजाराकडे वाटचाल, जाणून घ्या लेटेस्ट भाव)

जुन्या ग्राहकांनी काय करावं?

कर्जाचे व्याजदर वाढवल्यावर बँक आपल्या कर्जदारांना हप्ता वाढवण्याची किंवा मुदत वाढवण्याचा पर्याय देते. कर्जाची मुदत वाढवण्याचा पर्याय सर्वच ग्राहकांना मिळत नाही. कर्जाच्या मुदतीचा कालावधी कर्जदाराच्या निवृत्तीनंतर वाढवण्यास बँका परवानगी देत नाहीत. यामुळे अनेक ग्राहकांकडे अपफ्रंट पेमेंट करून कर्जाचा हप्ता आहे तेवढाच ठेवण्याचा पर्यायाच उरतो. तुमच्या मासिक उत्पन्नात तुम्हाला कर्जाचा वाढीव हप्ता भारानं शक्य असेल तर मुदतवाढ न घेता वाढीव हप्ता भरणं अधिक फायदेशीर आहे. यामुळे व्याजाची रक्कमही वाढत नाही.

First published:

Tags: Home Loan, SBI