जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI शेअरवर मोतीलाल ओसवाल बुलीश; 40 टक्के वाढीचा अंदाज, काय आहे कारण?

SBI शेअरवर मोतीलाल ओसवाल बुलीश; 40 टक्के वाढीचा अंदाज, काय आहे कारण?

SBI शेअरवर मोतीलाल ओसवाल बुलीश; 40 टक्के वाढीचा अंदाज, काय आहे कारण?

SBI चा शेअर 4.70 रुपयांच्या किंवा 0.96 टक्क्यांच्या वाढीसह 491.80 रुपयांवर बंद झाला. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 549.00 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 321.30 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 4.38 लाख कोटी रुपये आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मार्च: शेअर बाजारात (Share Market) योग्य वेळी योग्य शेअर खरेदी करणे चांगल्या कमाईसाठी महत्त्वाचे मानले जाते. अशावेळी अनेक ब्रोकरेज फर्म, मोठे गुतंवणूकदार, एक्सपर्ट्स यांचे अंदाज छोट्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतात. मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) यांनी अलीकडील नोटमध्ये म्हटले आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आपला बॅलेन्सशीट मजबूत करण्यावर सतत भर देत आहे. यासोबतच त्याचा रिटर्न रेश्यो सुधारण्यावरही भर दिला जात आहे. बँकेच्या व्यवस्थापनाचे लक्ष उच्च दर्जाचे, मजबूत लोन पोर्टफोलिओ तयार करणे आहे, ज्यामुळे बँकेच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. मोतीलाल ओसवाल पुढे म्हणाले की, आरबीआयने व्याजदरात वाढ केल्यास एसबीआय तिच्या ट्रेझरी पोर्टफोलिओमधील MTM तोटा सहन करण्यास सक्षम आहे. Multibagger stock: 27 रुपयांचा शेअर 2420 रुपयांवर, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई मोतीलाल ओसवाल असेही म्हणतात की व्याजदर वाढीच्या या वातावरणात ताकद राखण्यासाठी एसबीआय बँक तिच्या इतर समकक्ष बँकांच्या तुलनेत मजबूत स्थितीत आहे. हे लक्षात घेऊन, या स्टॉकचे बाय रेटिंग कायम ठेवताना, त्यासाठी 675 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. मोतीलाल ओसवाल यांचे म्हणणे आहे की, सध्याच्या पातळीवरून एसआयबीच्या स्टॉकमध्ये 40 टक्के वाढ होऊ शकते. मोतीलाल ओसवाल असेही म्हणतात की गेल्या काही तिमाहीत अंडररायटिंगमध्ये सुधारणा झाल्यामुळे आणि रिकव्हरी टीमने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे बँकेच्या अॅसेट क्वालिटी देखील सुधारली आहे. एक वर्षाच्या कालावधीत SBI च्या शेअर्समध्ये 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आणि यावर्षी आतापर्यंत शेअर 4 टक्क्यांनी वाढला आहे. Ruchi Soya FPO: इश्यू दोन दिवसात 24 टक्के सबस्क्राईब, गुंतवणूकदाचा कमी प्रतिसाद आज SBI चा शेअर 4.70 रुपयांच्या किंवा 0.96 टक्क्यांच्या वाढीसह 491.80 रुपयांवर बंद झाला. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 549.00 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 321.30 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 4.38 लाख कोटी रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात