मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger stock: 27 रुपयांचा शेअर 2420 रुपयांवर, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई

Multibagger stock: 27 रुपयांचा शेअर 2420 रुपयांवर, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई

अदानी ट्रान्समिशन 2021 चा मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय गेल्या 7 वर्षांच्या प्रवासावर नजर टाकल्यास शेअरची किंमत 27.60 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढली आहे.

अदानी ट्रान्समिशन 2021 चा मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय गेल्या 7 वर्षांच्या प्रवासावर नजर टाकल्यास शेअरची किंमत 27.60 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढली आहे.

अदानी ट्रान्समिशन 2021 चा मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय गेल्या 7 वर्षांच्या प्रवासावर नजर टाकल्यास शेअरची किंमत 27.60 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढली आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 25 मार्च : शेअर बाजारात (Share Market) संयम बाळगणे हा गुंतवणूक (Investment) करण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे. कारण शेअर्सची खरेदी-विक्री करून पैसे मिळत नाहीत. चांगले शेअर्स विकत घेतल्यानंतर, जर तुम्ही त्यात जास्त काळ टिकून राहिलात तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसे कमवू शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अदानी ट्रान्समिशनचा स्टॉक (Adani Transmission). गेल्या 7 वर्षातील या स्टॉकची कामगिरी पाहिली तर आपल्याला कळेल.

अदानी ट्रान्समिशन 2021 चा मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय गेल्या 7 वर्षांच्या प्रवासावर नजर टाकल्यास शेअरची किंमत 27.60 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये सुमारे 86,680 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

CSK ICICI Bank Credit Card: चेन्नईच्या सामन्यांसाठी मिळेल कॉम्प्लिमेंट्री तिकीट, आणखी बरंच काही; चेक करा फीचर्स

अदानी ट्रान्समिशन शेअर प्राईज हिस्ट्री

गेल्या 1 महिन्यात, अदानी ट्रान्समिशनच्या शेअरची किंमत 2032 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढली आहे. एका महिन्यात या शेअरमध्ये सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 1578 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढला आहे. या स्टॉकने 6 महिन्यांत सुमारे 55 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी या स्टॉकने गेल्या वर्षभरात सुमारे 190 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या 5 वर्षांत अदानी समूहाचा हा मल्टीबॅगर स्टॉक 81.35 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढला आहे. 5 वर्षांत हा स्टॉक सुमारे 3670 टक्क्यांनी वाढला आहे.

त्याचप्रमाणे, जर आपण गेल्या 7 वर्षांच्या प्रवासावर नजर टाकली तर, 31 मार्च 2015 रोजी, हा स्टॉक NSE वर 27.60 रुपयांवर बंद झाला तर 24 मार्च 2022 ला हा स्टॉक NSE वरच 2420 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच 7 वर्षांच्या कालावधीत हा स्टॉक 87.7 पट चालला आहे.

गृहकर्जासाठी Cibil Score महत्त्वाचा; सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी 'हे' करा

या तेजीचा परिणाम गुंतवणुकीवर झाला

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 1.20 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 1.55 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 2.90 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 37.70 लाख रुपये मिळाले असते.

त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने 7 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 87.70 लाख रुपये मिळाले असते.

अदानी ट्रान्समिशन स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,464.30 रुपये आहे तर स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 821.05 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप रु. 265,978 कोटी आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market