जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Ruchi Soya FPO: इश्यू दोन दिवसात 24 टक्के सबस्क्राईब, गुंतवणूकदाचा कमी प्रतिसाद

Ruchi Soya FPO: इश्यू दोन दिवसात 24 टक्के सबस्क्राईब, गुंतवणूकदाचा कमी प्रतिसाद

Ruchi Soya FPO: इश्यू दोन दिवसात 24 टक्के सबस्क्राईब, गुंतवणूकदाचा कमी प्रतिसाद

रुची सोया या ऑफरद्वारे 4300 कोटी रुपये उभारणार आहे. यातून अँकर गुंतवणूकदारांकडून 1,290 कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने प्रति शेअर 615 ते 650 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मार्च : रुची सोयाच्या FPO ला (Ruchi Soya FPO) दुसऱ्या दिवशीही गुंतवणूकदारांचा कमी प्रतिसाद मिळाला. यामुळे दोन दिवस संपल्यानंतरही FPO सबस्क्राईब झालेला नाही. कंपनीचा इश्यू 24 मार्च रोजी उघडण्यात आला. 25 मार्चपर्यंत कंपनीचे इश्यू केवळ 24 टक्के सबस्क्राईब झाला आहे. FPO अंतर्गत कंपनीने 4,89,46,260 शेअर्स ऑफर केले होते, तर आतापर्यंत फक्त 1,19,79,975 शेअर्सचा लिलाव झाला आहे. रुची सोयामध्ये पतंजलीची (Patanjali) 98.9 टक्के हिस्सेदारी आहे. या इश्यूनंतर पतंजलीची शेअरहोल्डिंग 81 टक्क्यांपर्यंत खाली येईल. SEBI च्या किमान शेअरहोल्डिंग नियमाची पूर्तता करण्यासाठी पतंजलीला तिचे शेअरहोल्डिंग 75 टक्क्यांपर्यंत खाली आणणे आवश्यक आहे. रुची सोयाच्या FPO मधील शेअरची किंमत त्याच्या बाजारभावापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे विश्लेषकांमध्ये या इश्यूबद्दल खूप उत्सुकता होती. मात्र, बाबा रामदेव यांच्या कंपनीवर गुंतवणूकदारांचा विश्वास बसत नाही. कंपनी इश्यूमधून उभारलेल्या निधीचा वापर कर्ज फेडण्यासाठी आणि बॅलेन्सशीट मजबूत करण्यासाठी वापरेल. Multibagger stock: 27 रुपयांचा शेअर 2420 रुपयांवर, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई 28 मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकता रुची सोया गुंतवणूकदारांना स्वस्त दरात शेअर्स खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. कंपनीच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफरमध्ये (FPO) 28 मार्चपर्यंत गुंतवणूक करता येईल. रुची सोया ही योगगुरू बाबा रामदेव यांची पतंजली समूहाची कंपनी आहे. एफपीओच्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 26 टक्क्यांपर्यंत सबस्क्राईब झाला होता. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चित केलेला कोटा 2.59 पट सबस्क्राईब झाला. क्वालिफाईड इंस्टिट्युशनल बायर्स आणि नॉन इन्स्टिट्युशनल इनवेस्टर्सनीही बोली लावणे सुरू केले आहे. त्यांच्यासाठी निश्चित केलेला कोटा अनुक्रमे 1 टक्के आणि 5 टक्के आहे. प्राइस बँड 615 ते 650 रुपये रुची सोया या ऑफरद्वारे 4300 कोटी रुपये उभारणार आहे. यातून अँकर गुंतवणूकदारांकडून 1,290 कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने प्रति शेअर 615 ते 650 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. शुक्रवारी 12:30 वाजता रुची सोयाच्या शेअरची किंमत 875 रुपये होती. अशा प्रकारे, कंपनी गुंतवणूकदारांना 26 टक्के सूट देऊन शेअर्स खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. QR Code scam: कोणत्याही बँकेत खातं असेल तर वेळीच व्हा सावध! SBI चा महत्त्वाचा इशारा किमान 13,650 रुपये गुंतवावे लागतील या FPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला किमान 21 शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. तुम्हाला या FPO मध्ये किमान 13,650 रुपये गुंतवावे लागतील. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही 21 च्या पटीत अधिक शेअर्ससाठी बोली लावू शकता. एफपीओचे उद्दिष्ट प्रमोटर्सचे स्टेक कमी करणे या एफपीओचा उद्देश कंपनीतील प्रमोटर्सचा हिस्सा कमी करणे हा आहे. सेबीच्या नियमांनुसार, रुची सोयासाठी प्रमोटर्सचे स्टेक 75 टक्क्यांपर्यंत खाली आणणे बंधनकारक आहे. सध्या कंपनीतील प्रमोटर्सची भागीदारी 98 टक्क्यांहून अधिक आहे. ऑफरबद्दल तज्ञांचे मत काय आहे? शेअरइंडियाचे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख रवी सिंग यांनी गुंतवणूकदारांना या ऑफरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीची आर्थिक स्थिती थोडीशी कमकुवत दिसत असली तरी, या एफपीओचा मजबूत आधार आणि पार्श्वभूमी लक्षात घेता गुंतवणूक करणे ही चांगली गुंतवणूक आहे. कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. सेंट्रम वेल्थ मॅनेजमेंटचे देवांग मेहता यांनी सांगितले की, रुची सोया ही सोयाबीन मार्केट, सोयाबीन मोहरीचे तेल आणि इतर अशा उत्पादनांमध्ये प्रमुख कंपन्यापैकी एक आहे. अशी उत्पादने असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी चांगला रस दाखवला आहे. त्यामुळे या FPO ला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात