नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: दिल्लीतल्या पहाडगंज येथे राहणाऱ्या अमित कुमार नावाच्या तरुण गुंतवणूकदारानं (Investors) काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. अमित आयपीओमध्ये (IPO) पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतो. आयपीओमध्ये कमी वेळेत आणि कमी गुंतवणुकीत जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते, असं त्याला वाटतं. वास्तविक पाहता अमित एकदम बरोबर विचार करत आहे. या वर्षी असे अनेक आयपीओ आले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. सिगाची आयएनडी (Sigachi Ind), पारस डिफेन्स (Paras Defence), लेटन्ट व्ह्युव अॅनालिटिक्स (Latent View Analytics), तत्त्व चिंतन फार्मा केम (Tattva Chinta Pharma Chem) आणि जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स (GR Infraprojects) या आयपीओंनी आपल्या लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळवून दिले.
गेल्या आठवड्यापासून अमित अस्वस्थ आहे. अमितनं चार वेगवेगळ्या खात्यांमधून पेटीएम आयपीओसाठी (Paytm IPO) अर्ज केला होता. त्याच्या चारही खात्यांमध्ये आयपीओ अलॉट झाला. आयपीओ मिळून देखील अमित चिंतेत आहे. यामागे पेटीएम आयपीओ हे कारण आहे! या वर्षी अमितनं जवळपास सर्व आयपीओसाठी अप्लाय केलं होतं; पण त्याला एकही चांगला आयपीओ मिळाला नाही. शेवटी त्याला चार आयपीओ मिळाले मात्र तेही पेटीएमचे. पेटीएमच्या आयपीओमुळे गुंतवणूकदारांचे पैसे मोठ्या प्रमाणात बुडाले आहेत, असं अमित सांगतो.
हेही वाचा- ₹1.85 चा शेअर पोहोचला 97 रुपयांवर! दीड वर्षात 1 लाखाचे झाले 52 लाख, मिळाला 5150% चा बंपर रिटर्न
शेअर बाजाराची सध्याची स्थिती पाहता, असे अनेक आयपीओ आहेत ज्यामध्ये पैसे गुंतवायचे की नाही हा मोठा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर उभा राहिला आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शेअर बाजारावर परिणाम झाल्यानंतर सोनं वधारलं, Gold मध्ये मोठी तेजी
कंपनी प्रमोटर्सचा अभ्यास
आयपीओमध्ये (IPO) पैसे गुंतवण्यापूर्वी कंपनीच्या प्रमोटर्सचा (Company promoters) म्हणजे प्रवर्तकांचा नक्की अभ्यास करा. कारण, मजबूत प्रमोटर्सच कंपनीला चांगली ग्रोथ देऊ शकतात. प्रमोटर्स किती मजबूत आहेत, कंपनीसंबंधी त्यांची दृष्टी काय आहे आणि त्यांचा अनुभव कसा आहे, या गोष्टींबद्दल नक्कीच जाणून घ्या. प्रमोटर्सची सर्व माहिती सोशल मीडियावर सहज उपलब्ध होऊ शकते.
कंपनीचा बिझनेस
तुम्ही ज्या कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत आहात, त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल (Business model) समजून घ्या. क्रिएटिव्ह आणि काहीसं हटके असलेलं बिझनेस मॉडेल मार्केटमध्ये नेहमी सर्वांच्या पसंतीस उतरतं. याशिवाय कंपनीच्या उत्पादनाला येत्या 5 वर्षांत किती मागणी असेल, याचाही अभ्यास करा. कंपनीचा व्यवहार किती शाश्वत असेल, तिच्या इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांची वाढ कशी होत आहे, या गोष्टीदेखील पडताळून पाहाव्यात.
हेही वाचा- LPG Connection: आधार कार्डवर मिळवा एलपीजी कनेक्शन, वाचा काय आहे प्रक्रिया
तुम्ही ज्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणार आहात त्याचा अप्पर प्राइस बँड नक्की तपासून पाहा. बाजारात सध्याच्या किंवा इतर आगामी आयपीओच्या प्राइस बँड (IPO Price Band) काय आहेत यांची तुलना करून पहा. कंपनीचा प्राइस बँड फार जास्त तर नाही ना, ही गोष्ट कटाक्षानं तपासा. कारण, पेटीएमच्या बाबतीत हेच झालं. पेटीएमचा प्राइस बँड खूप जास्त होता; मात्र त्यातून समाधानकारक रिटर्न्स मिळाले नाहीत.
तज्ज्ञ काय म्हणतात?
जेव्हा एखादा नवीन आयपीओ लिस्ट होणार असतो तेव्हा मीडियामध्ये जवळपास सर्व मार्केट एक्सपर्ट्स (Market Experts) त्याबाबत आपलं मत व्यक्त करत असतात. आयपीओ घेण्यापूर्वी मार्केट एक्सपर्टच्या मतांचा नक्कीच अभ्यास करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Share market