मुंबई, 26 नोव्हेंबर: तुम्ही एलपीजी गॅस कनेक्शन (LPG Gas Connection) मिळवायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इंडियन ऑयल कॉरपोरेशन लिमिटेड (IOC) च्या इंडेन ग्राहकांना एक मोठी सुविधा मिळत आहे. कंपनीच्या मते, इंडेनच्या ग्राहकांना आधार कार्ड दाखवून एलपीजी कनेक्शन घेता येईल. याशिवाय तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. याचा फायदा नवीन कनेक्शन घेणाऱ्यांना होणार आहे.
एखाद्या नवीन शहरात जर एलपीजी कनेक्शन घेताना अडचण येऊ शकतात, अशावेळी ही सुविधा फायद्याची ठरेल. नवीन कनेक्शनसाठी विविध प्रकारच्या कागदपत्रांची मागणी केली जाते, खासकरून तुम्ही कुठे राहता याचे प्रूफ द्यावे लागतात. शहरात काम करणाऱ्या बऱ्याचशा प्रवासी मजुरांकडे हा अॅड्रेस प्रूफ नसतो. अशावेळी येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे.
हे वाचा-PNB Mega E-auction: स्वस्तात खरेदी करा घर! ही बँक आज देतेय संधी; वाचा सविस्तर
इंडेनने ट्वीट करत दिली माहिती
या सुविधेबाबात इंडियन ऑइलने ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर असे म्हटले आहे की, 'नवीन इंडेन कनेक्शन त्वरित हवे आहे का? केवळ तुमचे आधार कार्ड दाखवा आणि एलपीजी कनेक्शन लगेच मिळवा. अॅड्रेस प्रूफ दिल्यानंतर तुम्ही हे कनेक्शन सब्सिडी असणाऱ्या कनेक्शनमध्येही बदलून घेऊ शकता.'
Need a new #Indane connection right now? Just show your #AadhaarCard and get an #LPG connection instantly!
What’s more… you can even convert it to a subsidised connection once you provide the address proof! pic.twitter.com/Hsgo9xQ5ny — Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) October 18, 2021
कशाप्रकारे मिळवाल कनेक्शन?
सर्वात आधी तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जावे लागेल. त्याठिकाणी एलपीजी कनेक्शनचा फॉर्म भरा, त्यात आधार डिटेल्स भरणे आवश्यक आहे. फॉर्मसह तुम्हाला आधारची एक कॉपी देखील द्यावी लागेल. तुम्ही कुठे राहता त्या पत्त्याबाबत तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागेल. तुम्ही कुठे राहता आणि तुमचा घर नंबर याठिकाणी द्यावा लागेल. यानंतर लगेच तुम्हाला एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून दिले जाईल
दरम्यान या एलपीजी कनेक्शनवर सब्सिडी मिळवण्यासाठी तुम्हाला अॅड्रेस प्रूफ अर्थात तुम्ही कुठे राहता त्याचा दाखला द्यावा लागेल. अॅड्रेस प्रूफ जमा केल्यानंतर तुमचे एलपीजी कनेक्शन सब्सिडी असणाऱ्या कनेक्शनमध्ये बदलले जाईल. आता सरकारकडून एलपीजी ग्राहकांच्या खात्यात सब्सिडी जमा केली जात आहे.
हे वाचा-Interesting Fact: 'या' कारणामुळे जगात झाला होता Cryptocurrency चा उदय
आधार कार्डवर एलपीजी कनेक्शन मिळवण्याची ही योजना सर्व घरगुती सिलेंडरवर लागू आहे. मात्र यामध्ये कमर्शिअल एलपीजी कनेक्शनचा समावेश नाही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LPG Price