बेंगळुरू, 10 फेब्रुवारी: गेल्या काही वर्षांपासून आयटी क्षेत्र (IT Sector) एक नवी उभारी घेत आहे. या क्षेत्रामध्ये आणि क्षेत्राशी संबंधित इतर सेक्टर्समध्ये 10 लाख नोकऱ्या उपलब्ध करण्याचा मानस कर्नाटक डिजिटल इकॉनॉमी मिशन (KDEM) चा आहे. 2025 पर्यंत हे ध्येय साध्य करण्याचा KDEM चा मानस आहे. कारण या कालावधीमध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवण्यात येणार आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. सी एन अश्वथ नारायण यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. नारायण यांनी असा विश्वास व्यक्त केला की, केडीईएम कडून 2025 पर्यंत दहा लाख रोजगार निर्माण केले जातील. शिवाय यामुळे कर्नाटकला आयटी निर्यातीत 150 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठण्यासाठी तसंच 2025 पर्यंत 300 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्यास मदत केली जाईल, असंही ते म्हणाले. Karnataka Digital Economy Mission च्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभावेळी ते बोलत होते. जीएसडीपीमध्ये 30 टक्क्यांपर्यंत डिजिटल इकॉनॉमीचे योगदान वाढवणे आणि हे लक्ष्य गाठण्यासाठी ‘Beyond Bengaluru’ अहवाल सादर करणे हे या उपक्रमाचे लक्ष्य आहे. (हे वाचा- या शहरात पेट्रोलचे भाव जवळपास 100 रुपये प्रति लीटर, मुंबईत आहेत हे दर ) नारायण यांनी असा विश्वास व्यक्त केला की KDEM राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडेल. दुर्गम भागातही फायदे पोहोचवणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. अशा दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचं लक्ष्य या उपक्रमाअंतर्गत पार पाडले जाणार आहे. याठिकाणी पुरेशी वीज उपलब्ध करून देणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करून ग्रामीण आणि शहरी भागातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून डिजिटल अर्थव्यवस्थेला मजबुती मिळेल असंही ते म्हणाले. (हे वाचा- नोकरी बदलल्यानंतर येणारी ही समस्या अशी सोडवा,PF खात्यामध्ये अशाप्रकारे करा अपडेट) इलेक्ट्रॉनिक्स, IT/BT विभागाचे अॅडिशनल चीफ सेक्रेटरी इव्ही रमण्णा रेड्डी असं म्हणाले की, जीएसडीपी मध्ये आयटी क्षेत्राचे योगदान 25 टक्के आहे आणि त्यापैका 98 टक्के एकट्या बंगळुरूतील आहे. आयटी क्षेत्रात इतरही भागांचा सहभाग असावा याकरता ‘Beyond Bengaluru’ उपक्रम हाती घेण्यात आल्याचे ते म्हणाले. अर्थात आयटी क्षेत्रात बंगळुरू या शहराव्यतिरिक्त नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.