कोणी जबरदस्तीनं Aadhaar नंबर मागितला तर जावं लागेल तुरुंगात, सरकारचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत The Aadhaar and Other Laws (Amendment) Bill, 2019 ला मंजुरी मिळालीय.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 07:13 PM IST

कोणी जबरदस्तीनं Aadhaar नंबर मागितला तर जावं लागेल तुरुंगात, सरकारचा निर्णय

मुंबई, 14 जून : बँक खातं उघडण्यासाठी आणि नवं मोबाइल कनेक्शनसाठी आता आधार कार्डाची अजिबात गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत The Aadhaar and Other Laws (Amendment) Bill, 2019 ला मंजुरी मिळालीय. याचा अर्थ हा Aadhar and Other Laws (Amendment) Ordinance, 2019 ची जागा घेईल. या विधेयकाला संसदेच्या पुढच्या सत्रात सादर केलं जाईल.

आता तुमच्याकडे कुणीही जबरदस्तीनं आधार कार्ड मागू शकत नाही. असं केलं तर 1 कोटी रुपयांपर्यंत दंड आहे. आधार कार्डाचा चुकीचा वापर गुन्हा आहे आणि त्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंत दंड आणि सोबत तीन वर्षांची कैद होऊ शकते.

खासगी क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी सरकारी नोकरी उपलब्ध, 'इथे' आहेत संधी

याबद्दल जाणून घेऊ

सरकारच्या या निर्णयामुळे UIDAI ला लोकांच्या हितात निर्णय घेण्याची आणि आधारचा चुकीचा उपयोग थांबवण्याची संधी मिळेल.

Loading...

JEE Advanced result 2019 : मुंबईचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

तुमच्या ओळखीसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही

संसदेनं तयार केलेल्या कायद्यानुसार काही गोष्टींसाठी आधार कार्ड आवश्यक आहे

1.14 लाख गुंतवून सुरू करा व्यवसाय आणि कमवा महिन्याला 15 हजार रुपये

बँक खातं उघडण्यासाठी आधार गरजेचं नाही. फोनमधल्या सिम कार्डासाठीही आधार कार्ड आवश्यक नाही. व्हर्चुअल आयडेंटिटीवरूनही तुम्ही तुमची ओळख दाखवू शकता.

मुलांना वयाच्या 18 वर्षांनंतर आधार नंबर रद्द करण्याचा अधिकार आहे.

सुरक्षेसंबंधी काही असेल तर तिथे आधार कार्ड अनिवार्य करण्याचं केंद्र आणि राज्य सरकार ठरवू शकतं. युनिक आयडेंटिफिकेशन अथाॅरिटी आॅफ इंडिया फंडच्या तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला गेलाय.

आधार कायद्याचं उल्लंघन केलं तर 1 कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो.


SPECIAL REPORT : ऑन ड्युटी बारमधली आवडली ब्युटी, खाकीची मान घालवणारा 'चिंगम'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 07:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...