मुंबई, 14 जून : जाॅइंट एन्टरन्स एक्झॅमिनेशन (JEE ) अॅडव्हान्सचा निकाल आज ( 14 जून ) लागला. या परीक्षेत मुंबईचा कार्तिकेय गुप्ता भारतातून पहिला आलाय. त्याला AIR 1 मिळालंय. त्याला 372पैकी 346 गुण मिळालेत. ही परीक्षा IIT-Roorkee घेतं. या वर्षी JEE मेन एप्रिल एक्झाममध्ये कार्तिकेय गुप्ता 18 वा आला होता. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी jeeadv.ac.in या वेबसाइटवर रिझल्ट पाहावा.
या परीक्षेत महाराष्ट्रातली तुलिप सचिन पांडे ही विद्यार्थिनी भारतातून 3री आलीय. तिला AIR 3 मिळालंय. तिला एकूण 73वी रँक मिळालीय. या परीक्षेसाठीची सर्वसाधारण उत्तरं 4 जूनला प्रसिद्ध झाली होती.
घर खरेदी करणाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकतं मोठा दिलासा
माता न तू वैरणी..औरंगाबादेत प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला घरात डांबले
JEE ( Advanced ) 2019च्या पेपर 1 आणि 2 साठी एकूण 1,61,319 विद्यार्थी बसले होते. त्यातले 38705 उत्तीर्ण झाले. एकूण उमेदवारांमध्ये 5356 स्त्रिया होत्या. मधापूरची शबनम सहाय हिला टाॅप रँक मिळालीय. तिला 372पैकी 308 गुण मिळाले.
1.14 लाख गुंतवून सुरू करा व्यवसाय आणि कमवा महिन्याला 15 हजार रुपये
JEE Advanced उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला प्रत्येक विषयात कमीत कमी 10 टक्के गुण मिळायला हवेत. आणि एकूण 30 टक्के गुण हवेत.
JEE Advanced result 2019: कसा पाहायचा निकाल?
jeeadv.ac.in या आॅफिशियल वेबसाइटवर जा.
रिझल्टसाठी http://35.244.19.194/ इथे क्लिक करा
रजिस्टर्ड नंबरानं लाॅग इन करा
अॅन्सर की समोर येईल. ती डाऊनलोड करा
JEE Advanced ची पुढची परीक्षा देण्यासाठी यातूनच उमेदवार निवडले जातात.
2019मध्ये 11.47 लाख उमेदवारांपैकी 2.45 लाख विद्यार्थी JEE Advanced ला निवडले गेले. त्यापैकी 1.73 लाख उमेदवारांनी रजिस्टर्ड केलं. 2018मध्ये 2.31 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी निवडले गेले. त्यातल्या 1.65 लाख उमेदवारांनी रजिस्टर्ड केलं. पण रजिस्टर्ड झालेले सगळेच जण परीक्षेला बसतातच असं नाही.