मुंबई, 14 जून : तुम्हाला वाटत असेल की व्यवसाय सुरू करायचाय तर जास्त रकमेची गरज आहे. पण असं दर वेळी असत नाही. मोदी सरकारच्या मदतीनं तुम्ही दीड लाख रुपयाच्या आत गुंतवणूक करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्याकडे 1.14 लाख रुपये आहेत तर तुम्ही महिन्याला 15 हजार रुपये कमावू शकता. यासाठी तुम्हाला मदत करेल सरकारची मुद्रा स्कीम. या योजनेअंतर्गत सरकारनं मुद्रा स्कीमसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलाय. यात तुम्ही मेटलच्या वस्तू बनवण्याचं युनिट सुरू करू शकता. मेटलच्या वस्तू बनवण्याच्या युनिटद्वारे तुम्ही कटलरीपासून हँड टूलपर्यंत, अगदी शेतीसाठी लागणारी काही साधनंही बनवू शकता. स्वयंपाकघरात लागणाऱ्या छोट्या, आकर्षक चमच्यांना मागणी असते. तुम्ही तुमच्या प्राॅडक्टचं मार्केटिंग उत्तम प्रकारे केलंत तर तुमचा व्यवसाय आणखी वाढू शकतो. मुंबईत उड्डाणपुलाखाली भीषण अग्नितांडव, गाड्या जळून खाक धक्कादायक ! मुंबईत 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार समजून घ्या पूर्ण प्रोजेक्ट सेटअपवर खर्च - 1.8 लाख रुपये यात मशीन्स येतात. म्हणजे वेल्डिंग सेट, बफिंग मोटर, बेंच ग्रिंडर, हँड ड्रिलिंग, हँड ग्रिंडर, बेंच, पॅनल बोर्ड आणि इतर साधनं. कच्च्या मालावर खर्च - 1.20 लाख रुपये ( 2 महिन्यांचा कच्चा माल ) सामना रद्द झाल्यामुळं चक्क रडली झिवा, फोटो व्हायरल या कच्च्या मालात दर महिन्याची 40 हजार कटलरी, 20 हजार हँड टूल आणि 20 हजार शेतीची साधनं बनू शकतात पगार आणि इतर खर्च - दर महिना 30 हजार रुपये एकूण खर्च - 3.3 लाख रुपये यात तुमचा खर्च असेल 1.14 लाख रुपये. बाकीचा खर्च सरकार देतं. त्यात 1.26 लाख रुपये टर्म लोन आणि 90 हजार रुपयांचं वर्किंग कॅपिटल कर्ज सरकार देतं. अशी होईल कमाई या अहवालानुसार 1.10लाख रुपये महिन्याला विक्री होईल. त्यासाठी खर्च 91, 833 रुपये येईल. म्हणजे नफा जवळजवळ 18,167 रुपये होईल. यात 13 टक्के कर्जाच्या व्याजानुसार दर महिन्याला 2340 रुपये जमा करावे लागतील. इंसेंटिव्हचा खर्च 1 टक्क्याच्या हिशेबानं 1100 रुपये येईल. म्हणजे एकूण नफा 14,427 रुपये होईल. करू शकता अर्ज या योजनेअंतर्गत तुम्ही कुटळ्याही बँकेत अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला फाॅर्म भरावा लागेल. त्यात नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, मिळकत आणि किती कर्ज हवं ते तुम्हाला सांगावं लागेल. राज ठाकरेंचा 51वा वाढदिवस, सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.