मुंबई, 14 जून : खासगी क्षेत्रातल्या लोकांना आता लवकरच सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत. कृषी, आरोग्य, उर्जा क्षेत्रात भरतीची तयारी सुरू झालीय. CNBC आवाजच्या सूत्रांकडून कळलेल्या माहितीनुसार नीती आयोगानं तरुण प्रोफेशनल्ससाठी जागा काढल्यात. नीती आयोगाकडे 60 जागांसाठी 7500 अर्ज मिळालेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी जास्तीत जास्त वय 32 वर्ष हवं. सोबत त्यांना 2 वर्षांचा अनुभव हवा.
या पदांसाठी मॅनेजमेंट प्रोफेशनल्स, सीए, इंजिनीयर आणि एमबीबीएएस यांनी अर्ज केलेत. याआधी 9 जणांना संयुक्त सचिव पदासाठी नियुक्त केलं होतं. या पदावर जास्त करून आयएएस, आयपीएस किंवा इतर प्रमुख सेवांमधल्या व्यक्तींना नियुक्त केलं जातं.
ई वाॅलेटमध्ये मित्रानं पैसे ट्रान्सफर केले तर कर लागतो का?
12 वी उत्तीर्ण असलेल्यांना भारतीय नौदलात संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज
कुठे आहेत सरकारी नोकऱ्या?
सरकारी नोकरीत आता खासगी क्षेत्रातल्या लोकांची एन्ट्री सोपी झालीय. मोठ्या प्रमाणावर भरती सुरू झालीय. सध्या नीती आयोगानं 60 तरुण प्रोफेशनल्सची भरती काढली आहे.
घर खरेदी करणाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकतं मोठा दिलासा
या नोकऱ्यांसाठी चार्टर्ड अकाउंट, इंजिनीयर, एमबीबीएस यांनी अर्ज केलेत. नीती आयोगानं निवडलेल्या उमेदवारांना दुसऱ्या मंत्रालयात जागा मिळेल. यासाठी 2 वर्षांचा अनुभव आणि जास्तीत जास्त 32 वय ठेवलं गेलंय. कृषी, आरोग्य, अर्थ, उर्जा या क्षेत्रांसहित 20 क्षेत्रांमध्ये भरती आहेत. फ्लॅक्सी पूलसाठी 54 पदांवर भरती केली जाईल. डेप्युटी सेक्रेटरी, डायरेक्टर या पदांसाठीही खासगी क्षेत्रांतून भरती सुरू झालीय. DOPT 400 पदांसाठी भरतीची तयारी सुरू आहे. दोन महिने आधी जाॅइंट सेक्रेटरी पदासाठी 9 लोकांची भरती झाली होती. यांना IASचा दर्जा दिला जातो.
SPECIAL REPORT : कुत्र्यांनी हल्ला केला होता तो बिबट्या नव्हताच, हे आहे सत्य