Home /News /money /

मोदी सरकारचा मोठा निर्णय, बंद केली 3.38 लाख कंपन्यांनी बँक खाती

मोदी सरकारचा मोठा निर्णय, बंद केली 3.38 लाख कंपन्यांनी बँक खाती

अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने देशातील 3.38 लाख निष्क्रिय कंपन्यांच्या (Inoperative) विविध बँकांमधील खात्यांवर बंदी घातली आहे.

    नवी दिल्ली, 04 मार्च : अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने देशातील 3.38 लाख निष्क्रिय कंपन्यांच्या (Inoperative) विविध बँकांमधील खात्यांवर बंदी घातली आहे. इतकच नव्हे तर  सीबीआयने बँकांमध्ये घोटाळा करणाऱ्यांवर 626 गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी 2 हजार 111 वरील आरोप निश्चित झाले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने ही कारवाई  2016-17 या आर्थिक वर्षापासून या वर्षीच्या 31 जानेवारीपर्यंत केली आहे. खासदार रवि प्रकाश वर्मा यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे. बँकांमधील घोटाळा रोखण्यासाठी सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना (पीएसबी) काही सल्ले देण्यात आले आहेत -50 कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेणार्‍या कंपन्यांचे प्रमोटर्स, संचालक आणि अधिकृत स्वाक्षर्‍या करणाऱ्यांना (Authorized signatories) पासपोर्टची प्रमाणित प्रत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. -आरबीआयच्या सूचनेनुसार, जाणीवपूर्वक डिफॉल्टर होणाऱ्यांचे फोटो प्रकाशित करण्यात यावेत. (हे वाचा-सोन्याने गाठला उच्चांक! इतिहासात पहिल्यांदा गाठला हा दर, बुधवारचे भाव इथे वाचा) -बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांची रोटेशनल बदली काटेकोरपणे करावी -सार्वजनिक क्षेत्रातील बँक प्रमुखांना लुकआऊट परिपत्रक जारी करण्याचे अधिकार देण्याची विनंती करण्यात आली आहे. -ऑडिटची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी नावाची एजन्सी तयार केली गेली आहे. अन्य बातम्या PNB सह 10 बँकांच्या विलीनीकरणाला मंजूरी, ग्राहकांच्या खात्यावर होणार हे परिणाम Paytm वर आता काढू शकता जीवन विमा, योजना नेमकी काय आहे? Paytm वर आता काढू शकता जीवन विमा, योजना नेमकी काय आहे?
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bank, Modi governement

    पुढील बातम्या