Home /News /money /

PNB सह 10 बँकांच्या विलीनीकरणाला मंजूरी, जाणून घ्या 1 एप्रिलपासून ग्राहकांच्या खात्यावर कोणते परिणाम होणार

PNB सह 10 बँकांच्या विलीनीकरणाला मंजूरी, जाणून घ्या 1 एप्रिलपासून ग्राहकांच्या खात्यावर कोणते परिणाम होणार

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठ्या बँकांच्या विलीनीकरण (PSU Bank Merger) करण्यास मंजूरी मिळाली आहे. 1 एप्रिल 2020 पासून या बँकांचा कारभार सुरू होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या या विलीनीकरणाचा ग्राहकांवर काय परिणा होणार आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 04 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठ्या बँकांच्या विलीनीकरण (PSU Bank Merger) करण्यास मंजूरी मिळाली आहे. अर्थ मंत्रालयाकडून 30 ऑगस्ट 2019 ला विलीनीकरणाबतची घोषणा करण्यात आली होती. यासंदर्भात सरकारकडून नोटिफिकेशन सुद्धा जारी करण्यात येईल. त्यानंतर देशामध्ये 4 मोठ्या बँका अस्तित्वात येतील. 1 एप्रिल 2020 पासून या बँकांचा कारभार सुरू होण्याची शक्यता आहे. मीडिया अहवालानुसार विलीनीकरण झाल्यानंतर या बँकांची नावं देखील बदलण्यात येतील. दरम्यान सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विलीनीकरण करण्याची घोषणा करताना असं सांगितलं होतं की, हे विलीनीकरण झाल्यानंतर देशामध्ये सरकारी बँकांची संख्या 12 वर येईल. (हे वाचा- Cryptocurrency वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, भारतीय करू शकणार Bitcoin चा वापर) 2017 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 होती. याआधी देना बँक आणि विजया बँक, बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाली होती. कोणती बँक कोणत्या बँकेत होणार विलीन? -पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक विलीन होईल. यानंतर तयार होणारी बँक देशातील दुसरी मोठी बँक असेल. या बँकेचा व्यवहार 17 लाख कोटींचा असेल. -कॅनरा बँकेबरोबर सिंडीकेट बँकेचं विलीनीकरण होईल. यानंतर बनणारी बँक देशातील चौथी मोठी बँक असेल. या बँकेचा व्यवहार 15.20 लाख कोटींचा असेल. (हे वाचा- आयकर विभागाकडून अलर्ट! पॅन-आधार लिंक न केल्यास भरावा लागणार 10 हजारांचा दंड) -युनियन बँकेचं आंध्रा बँक आणि कॉरपोरेशन बँकेबरोबर विलीनीकरण होईल. यानंतर बनणारी बँक देशातील पाचवी मोठी बँक असेल. या बँकेचा व्यवहार 14.59 लाख कोटींचा असेल. -इंडियन बँकेबरोबर अलाहाबाद बँकेचं विलीनीकरण होईल. यानंतर बनणारी बँक देशातील सातवी मोठी बँक असेल. या बँकेचा व्यवहार 08.08 लाख कोटींचा असेल. ग्राहकांवर होणार परिणाम विलीनकरण झाल्यानंतर ग्राहकांना नवीन अकाउंट नंबर आणि कस्टमर आयडी मिळू शकतो. ज्या ग्राहकांना नवीन अकाउंट किंवा IFSC कोड मिळेल, त्यांना ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंट, इन्शुरन्स कंपनी, म्युच्यूअल फंड, नॅशनल पेंशन स्कीम इत्यादी ठिकाणी अपडेट करावी लागेल. SIP किंवा लोनच्या EMI साठी ग्राहकांना नवीन इन्स्ट्रक्शन फॉर्म भरावा लागेल. त्याचप्रमाणे ग्राहकांना नवीन चेकबुक, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड देण्यात येण्याची शक्यता आहे. एफडी किंवा आरडीवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही परिणाम होणार नाही. ज्या व्याजदरांवर ग्राहकांनी घर कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतलं आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. बँकेच्या काही शाखा बंद होऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या