Home /News /money /

सोन्याने गाठला उच्चांक! इतिहासात पहिल्यांदा गाठला हा दर, बुधवारचे भाव इथे वाचा

सोन्याने गाठला उच्चांक! इतिहासात पहिल्यांदा गाठला हा दर, बुधवारचे भाव इथे वाचा

यामुळे सोनं आणि महागड्या कार्स खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. या गोष्टी आता स्वस्त होतील.

यामुळे सोनं आणि महागड्या कार्स खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. या गोष्टी आता स्वस्त होतील.

अमेरिकेतील सेंट्रल बँकेचे व्याजदर घटले आहेत तर दुसरीकडे कोरोनाचा धोका वाढला आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याला अधिक पसंती दिली आहे. परिणामी सोन्याने इतिहासातील सर्वात मोठा दर गाठला आहे.

    नवी दिल्ली, 04 मार्च : भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. Cornovirus चा वाढता धोका पाहता देशांतर्गत बाजारात सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आज शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यामुळे सुद्धा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती देण्यात आली आहे. सोन्याचे आजचे दर (Gold Prices today) गगनाला भिडले आहेत. इतिहासातील सर्वात मोठा सोन्याचा दर आज नोंदवण्यात आला आहे. तर चांदीलाही झळाळी (Silver Price today) प्राप्त झाली आहे.बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 1 हजार 155 रुपयांनी महागलं आहे. तर चांदीचे दर प्रति किलो 1 हजार 198 रुपयांनी वाढले आहेत. (हे वाचा-PNB सह 10 बँकांच्या विलीनीकरणाला मंजूरी, ग्राहकांच्या खात्यावर होणार हे परिणाम) तज्ज्ञांच्या माहितीनुसार अमेरिकेतील सेंट्रल बँकेचे व्याजदर घटले आहेत तर दुसरीकडे कोरोनाचा धोका वाढला आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीनी एवढी उसळी घेतली आहे. सोन्याचे आजचा दर बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 43 हजार 228 रुपयांवरून 44 हजार 383 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या किंमतीमध्ये आज 1 हजार 155 रुपयांनी वाढ झाली. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा 6 रुपयांनी वाढ झाली होती. चांदीचे आजचे दर सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. (हे वाचा-Cryptocurrency वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, भारतीय करू शकणार Bitcoin चा वापर) आज चांदीचे दर प्रति किलो 1 हजार 198 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे आजचे दर 47 हजार 729 रुपयांपर्यंत वाढले आहेत. सोनं कधी कमी होणार? HDFC सिक्युरिटीजचे (कमोडिटी) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दर 0.50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढून 1 हजार 638 रुपये प्रति औंस झाली आहे. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसमुळे देशांतर्गत शेअर बाजारावर अवकळा पसरली आहे. त्याचप्रमाणे रुपयाची किंमतही घसरली आहे. याचाच परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळाला. मात्र पुढील काही दिवसात सोनं उतरण्याची शक्यता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या