मुंबई, 04 मार्च: एखादी गुंतवणूक करताना आपण अनेक पर्याय तपासून पाहतो. तुम्हाला विमा काढताना आता आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.विमा काढताना किंवा पैशांची गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेतला जातो. विमा काढताना अधिक फायदा कोण देणार यावर नेमकी कुठे गुंतवणूक करायची हे ग्राहक ठरवत असतात. भारतामध्ये अधिकतर गुंतवणूक ही विमा कंपन्यांमध्ये केली जाते. आता विमा काढण्यासाठी पेटीएम एक नवा पर्याय घेऊन आलं आहे. ऑनलाईन व्यवहारांमध्ये ग्राहकांचा विश्वास मिळवल्यानंतर आता पेटीएम ग्राहकांसाठी नवा गुंतवणूकीचा पर्याय घेऊन आलं आहे.
ऑनलाईन पेमेंट प्लेटफॉर्म कंपनी म्हणजेचं पेटीएमची सहय्यक कंपनी पेटीएम विमा कंपनीने इंशूरेंस रेग्यूलेटरी अॅथॉरिची ऑफ इंडिया म्हणजेच IRDAI कडून लायसन मिळवलं आहे. या लायसनमुळे कंपनी देशभरातील लाखो ग्राहकांच्या विमा काढू शकणार आहे. PIBPAL ही कंपनी आत्ता टू-व्हीलर, फोर-व्हीलर आणि हेथसह जीवन विमा यासारख्या चार वेगवेगळ्या प्रकारचे विमा काढू शकणार आहे. PIBPAL कंपनीने भारतात आधी 20 मोठ्या विमा कंपन्याशी गठबंधन केल.
1.6 करोड पार्टनरसोबत घेणार फायदा:
POSPS कंपनी आपल्या मोठं जाळं पसरते आहे. जे विमा प्रोडक्ट विकून फायदा उठवण्याच्या तयारीत आहे. अतिरिक्त स्त्रोत, विमा प्रोडक्टमधून मिळणार कमिशन याच्या माध्यमातून कंपनी सशक्त बनणार आहे. या वर्षी योजनेच्या माध्यमातून 2 लाख POSPS सोबत जोडली जाणार आहे.
हे वाचा : ऑनलाईन फूडसाठी मिळणार आणखी एक पर्याय, झोमॅटो-स्वीगीला अॅमेझॉन देणार टक्कर
वित्तीय सेवांमध्ये कंपनीला वाढवण्यासाठी आणि लाखो ग्राहकांना वेगवेगळ्या योजना देण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं पेटीएमच्या प्रेसिडेंट अमित नैय्यर यांनी म्हटलं आहे. भारतात विमा काढणाऱ्यांची क्षमता अधिक आहे मात्र लोकांना जास्त पर्याय उपलब्ध नसल्यानं याचा फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटल आहे.पेटीएम विमा आपल्या लाखो ग्राहकांना योग्य सेवा देणार आहे.
हे वाचा : आयकर विभागाकडून अलर्ट! पॅन-आधार लिंक न केल्यास भरावा लागणार 10 हजारांचा दंड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.