जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पोस्टाच्या या योजेनेतून पती-पत्नी वर्षाला मिळवू शकतात 60 हजार रुपये; असा होईल डबल फायदा

पोस्टाच्या या योजेनेतून पती-पत्नी वर्षाला मिळवू शकतात 60 हजार रुपये; असा होईल डबल फायदा

पोस्टाच्या या योजेनेतून पती-पत्नी वर्षाला मिळवू शकतात 60 हजार रुपये; असा होईल डबल फायदा

या योजनेत पती-पत्नी दोघांच्या नावे गुंतवणूक करून वर्षाला साधारण 60 हजार रुपये म्हणजेच दरमहा साधारण पाच हजार रुपये मिळू शकतात. या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना (एमआयएस- MIS).

नवी दिल्ली 12 जुलै: कमी जोखीम आणि उत्तम परतावा अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या पोस्टाच्या बचत योजनांना (Post office Savings Scheme) सर्वसामान्य नागरिकांची पहिली पसंती असते. विशेषतः सेवानिवृत्तीनंतर आयुष्यभर जमा केलेली पुंजी सुरक्षित ठेवून त्याच्या व्याजावर गुजराण करण्यासाठी बहुतांश लोक पोस्टाच्या बचत योजनांचाच आधार घेतात. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन नसेल तर चांगला व्याजदर देणाऱ्या पोस्टाच्या योजना अत्यंत फायदेशीर ठरतात. पोस्टाची दरमहा निश्चित उत्पन्न देणारी अशीच एक योजना लोकप्रिय आहे. या योजनेत पती-पत्नी दोघांच्या नावे गुंतवणूक करून वर्षाला साधारण 60 हजार रुपये म्हणजेच दरमहा साधारण पाच हजार रुपये मिळू शकतात. या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना (एमआयएस- MIS). काय आहे एमआयएस योजना? एमआयएस योजनेत सिंगल (Single) आणि जॉइंट (Joint) दोन्ही प्रकारे खाते उघडता येते. वैयक्तिक सिंगल खाते उघडताना तुम्ही या योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करु शकता. परंतु, संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाखांपर्यंत रक्कम जमा केली जाऊ शकते. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. भारतात येतेय आणखी एक विमान कंपनी, मल्ल्यानंतर ‘आकाश’भरारीसाठी ‘बिग बुल’ सज्ज काय आहेत फायदे? या योजनेत दोन किंवा तीन लोक एकत्रित खातं उघडू शकतात. यात मिळणारं उत्पन्न प्रत्येक सदस्याला समान प्रमाणात दिलं जातं. आपण कधीही संयुक्त खातं एकाच व्यक्तीच्या म्हणजेच एकल खात्यात रूपांतरित करू शकता. तसंच एकल खातंदेखील संयुक्त खात्यात रूपांतरित करता येते. खात्यात बदल करण्यासाठी सर्व खाती सदस्यांनी संयुक्त अर्ज द्यावा लागतो. या योजनेत तुम्हाला सध्या 6.6 टक्के दराने वार्षिक व्याज मिळत आहे. योजनेंतर्गत तुमच्या एकूण ठेवींच्या वार्षिक व्याजांच्या आधारे परताव्याची(Return) मोजणी केली जाते. एकूण वार्षिक परतावा 12 भागात विभागला जातो. आपल्याला याद्वारे मिळणाऱ्या दरमहा उत्पन्नाची गरज नसेल तर ही रक्कम मूळ मुद्दलात जोडून त्यावर व्याज मिळू शकते. Gold Price Today: 8487 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीचा दरही घसरला समजा, या योजनेंतर्गत पती-पत्नीनं संयुक्त खात्यात 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर 9 लाखांच्या ठेवीवर 6.6 टक्के व्याज दराने वार्षिक परतावा 59 हजार 400 रुपये असेल. 12 भागात विभागणी केल्यास दरमहा 4,950 रुपये मिळतील. तुम्ही अशा पद्धतीनं दरमहा उत्पन्न खात्यात जमा करण्यास सांगू शकता किंवा वार्षिक परतावा खात्यात जमा करून त्यावर व्याज घेऊ शकता. या योजनेची 5 वर्षांची मुदत (Term) संपल्यानंतर ती पुन्हा 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात