नवी दिल्ली, 12 जुलै: मागील आठवड्यात सततच्या तेजीनंतर आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोने-चांदी दरात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एमसीएक्स मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं काहीशा घसरणीसह ट्रेड करत आहे. ऑगस्टमधील सोन्याचा वायदे भाव (Gold latest price) 219 रुपयांच्या घसरणीसह 47704 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करतो आहे. त्याशिवाय चांदीच्या दर 0.33 टक्के म्हणजेच 232 रुपयांच्या घसरणीसह 69,065 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. ऑक्टोबर वायदे बाजारानुसार, सोन्यात आज 188 रुपयांची घसरण झाली असून 47970 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत आहे. 8487 रुपये स्वस्त - 2020 नुसार, मागील वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56191 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर होता. आज सोन्याचा ऑगस्ट वायदे भाव MCX वर 47704 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर आहे. म्हणजेच आता उच्चांकी स्तरावरुन सोनं जवळपास 8487 रुपये स्वस्त आहे.
(वाचा - Good News! मोदी सरकारकडून आजपासून खरेदी करा स्वस्त सोनं, RBI ने जारी केली किंमत )
आंतरराष्ट्रीय बाजार - आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने दरात घसरण पाहायला मिळाली. 0.1 टक्के वाढ होऊन सोनं 1,809.34 डॉलर प्रति औंस आहे. अमेरिकी सोने वायदे भाव 0.1 टक्के घसरणीसह 1,809.3 डॉलरवर बंद झाला. तर चांदी 0.6 टक्के वाढीसह 26.23 डॉलर प्रति औंस आहे.
(वाचा - केवळ 50 हजार गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला 1 कोटींची होईल कमाई )
24 कॅरेट गोल्ड दर - सोमवारी 24 कॅरेट गोल्डचा भाव सर्व शहरात वेगवेगळ्या स्तरावर ट्रेड करत आहेत. राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 50950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर कोलकातामध्ये 50070 रुपये, लखनऊमध्ये 50950 रुपये, मुंबईत 47810 रुपये आणि चेन्नईमध्ये 49160 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.