Home /News /money /

भारतात येतेय आणखी एक विमान कंपनी, मल्ल्यानंतर ‘आकाश’भरारीसाठी ‘बिग बुल’ सज्ज

भारतात येतेय आणखी एक विमान कंपनी, मल्ल्यानंतर ‘आकाश’भरारीसाठी ‘बिग बुल’ सज्ज

शेअर बाजारात ‘बिग बुल’ अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी नव्या एअरलाईन्समध्ये गुंतवणूक कऱण्याचा निर्णय घेतला असून एका परदेशी गुंतवणूकदारासोबत त्यांची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचं समजतं आहे.

    मुंबई, 12 जुलै: भारत आणि विमान कंपनी (airline) हे आतापर्यंत कधीही फायद्याचं न ठरणारं गणित जुळवण्यासाठी आता आणखी एक बडं नाव पुढं येत असल्याचं दिसत आहे. शेअर बाजारात ‘बिग बुल’ (Big Bull) अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी नव्या एअरलाईन्समध्ये गुंतवणूक (investment) कऱण्याचा निर्णय घेतला असून एका परदेशी गुंतवणूकदारासोबत (Foreign investor) त्यांची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचं समजतं आहे. लवकरच ही बोलणी पूर्ण होऊन प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी बातमी ‘टाईम्स ग्रुप’नं दिली आहे. या योजनेत राकेश झुनझुनवाला सुमारे 260 कोटी रुपये गुंतवण्याच्या तयारीत असून आतापर्यंत अनेक खासगी कंपन्यांसाठी आव्हान ठरलेल्या या उद्योगाला फायदेशीर मॉडेल देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांच्या उपस्थितीत ही बोलणी सुरू असून त्याला अंतिम स्वरूप आल्यानंतर देशांतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. हे वाचा -Good News! मोदी सरकारकडून आजपासून खरेदी करा स्वस्त सोनं, RBI ने जारी केली किंमत पुढच्या वर्षी ‘आकाश’ निश्चित होणार या कंपनीला आकाश असं नाव देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली असून प्राथमिक बोलणी पूर्ण झाल्यानंतर सर्व कायदेशीर बाबी या पुढील वर्षाअखेरपर्यंत संपतील, असं सांगण्यात आलं आहे. या प्रक्रियेची सुरुवात एनओसी मिळवण्याच्या प्रक्रियेपासून होणार आहे. किंगफिशर एअरलाईन्स, जेट एअरवेज यासारख्या बड्या कंपन्या या व्यवसायात आल्यानंतर छोट्या कंपन्यांनीदेखील त्यासाठीची  तयारी सुरू केल्याचं चित्र दिसत होतं. आता देशातील उद्योजक या व्यवसायत पैसा गुंतवण्याचा विचार करत असून ही सकारात्मक गोष्ट असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. ही नवी कंपनी जर प्रत्यक्षात अस्तित्वात आली तर ‘गो एअऱ’ आणि इंडिगोसारख्या कंपन्यांना आणखी एक प्रतिस्पर्धी निर्माण होणार आहे. अधिकाधिक विमान कंपन्यांचे पर्याय असणं ही स्पर्धात्मकता वाढवणारी बाब असून त्याचा सर्वसामान्य प्रवाशांना फायदाच होण्याची शक्यता आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Aeronautics, Travel by flight

    पुढील बातम्या