लॉकडाऊनमध्ये लाखो जणांसमोर बेरोजगारीचे संकट! एप्रिलपेक्षा मे महिन्यात सर्वाधिक लोकांनी गमावली नोकरी

लॉकडाऊनमध्ये लाखो जणांसमोर बेरोजगारीचे संकट! एप्रिलपेक्षा मे महिन्यात सर्वाधिक लोकांनी गमावली नोकरी

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळ अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. यामध्ये मे महिन्यातील बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जून : गेल्या 2 महिन्यांपासून कोरोना व्हायरसचे (Coronavirus) चे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ज्यामुळे देशातील अनेक व्यवहार ठप्प झाले असून, केवळ अत्यावश्यक सेवा काही प्रमाणात सुरू आहेत. काही भागांमध्ये आता शिथिलता आणण्यास जरी सुरूवात झाली असली तरीही, देशात उद्योगधंदे बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. यामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी मे महिन्यात वाढली आहे.  सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)च्या अहवालानुसार 31 मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारीचा दर 23.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर 23.52 टक्के राहिला आहे. 24 मे रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये बेरोजगारीचा दर 24.3 टक्के होता. हा दर लॉकडाऊन लागू होण्याच्या पहिल्या आठ आठवड्यांच्या कालावधीच्या सरासरी 24.2 टक्के दरापेक्षा अधिक आहे.

(हे वाचा-सराफा बाजार उघडण्यास सुरुवात झाल्यानंतर सोन्याचे दर वाढले, इथे वाचा आजचे दर)

देशामध्ये बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार जानेवारी 2020 मध्ये शहरी भागातील बेरोजगारीचा दर 9.70 टक्के इतका होता तर मे मध्ये या दरात 16.09 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी शहरी भागातील दर मे 2020 पर्यंत 25.79 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर ग्रामीण भागामध्ये जानेवारी 2020 मध्ये बेरोजगारीचा दर 6.06 टक्के होता, त्यामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. ही वाढ 16.42 टक्क्यांची आहे. या वाढीनंतर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 22.48 टक्के झाला आहे.

(हे वाचा- भारताचा आर्थिक दर शून्याखाली राहण्याचा अंदाज असल्यानं Moody's रेटिंग घटलं)

CMIE च्या अहवालानुसार केंद्र सरकारद्वारे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर मे महिन्यानंतर साधारण 2 कोटी लोक पुन्हा एकदा नोकरीवर जाऊ लागले आहेत. ज्यामुळे देशात रोजगाराचा दर 2 टक्क्यांनी वाढून 29 टक्क्यावर पोहोचला आहे. एप्रिलमध्ये हा दर 27 टक्के होता. CMIE च्या अहवालानुसार 25 मार्च 2020 रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील साधारण 12.20 कोटी लोकांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे.

First published: June 2, 2020, 3:31 PM IST

ताज्या बातम्या