सराफा बाजार उघडण्यास सुरुवात झाल्यानंतर सोन्याचे दर पुन्हा वधारले, जाणून घ्या मंगळवारचे भाव

सराफा बाजार उघडण्यास सुरुवात झाल्यानंतर सोन्याचे दर पुन्हा वधारले, जाणून घ्या मंगळवारचे भाव

लॉकडाऊन काळात बंद असलेले सराफा बाजार देखील काही प्रमाणात उघडण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर मंगळवारी सोन्याच्या भावामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जून :  देशभरात कोरोनाचे संक्रमण (Coronavirus) रोखण्यासाठी 25 मार्चपासून लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला होता. 1 जूनपासून अनलॉक 1.0 (Unlock 1.0) ची सुरूवात झाली आहे.  लॉकडाऊन काळात बंद असलेले सराफा बाजार देखील काही प्रमाणात उघडण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या भावामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या किंमतीनुसार आज बाजार उघडल्यानंतर 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति तोळा 47184 रुपये इतके होते, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 43221 रुपये प्रति तोळा इतके होते. सोमवारी बाजार बंद होत असताना सोन्याचे भाव प्रति तोळा 47043 रुपये इतके होते. दरम्यान गेल्या संपूर्ण आठवड्यामध्ये सोन्याच्या किंमती प्रति तोळा 47 हजारांच्या खालीच होत्या.

(हे वाचा-कस्टमर केअर अधिकारी बनून लंपास केले 9 लाख, SIM द्वारे तुमचीही होऊ शकते फसवणूक)

चांदीचे भावही आज काहीसे वधारलेले पाहायला मिळाले. आज चांदीचे दर (Silver Prices Today) 49670 रुपये प्रति किलो इतके आहेत. सोमवारी चांदीचे भाव 49330 रुपये प्रति किलो इतके होते. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर सोन्याचांंदीच्या दराबाबत हे अपडेट देण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे फ्यूचर मार्केटमध्ये देखील सोन्याचे दर वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून महिन्याच्या डिलीव्हरीच्या सोन्याचे भाव 226 रुपये अर्थात 0.48 टक्क्याने वाढले आहेत. परिणामी या महिन्यासाठी सोन्याचे दर 46,880 रुपये प्रति तोळा झाले आहेत.

(हे वाचा-भारताचा आर्थिक दर शून्याखाली राहण्याचा अंदाज असल्यानं Moody's रेटिंग घटलं)

दरम्यान एमसीएक्सवर ऑगस्ट महिन्यासाठी सोन्याचे दर 0.19 टक्क्यांनी अर्थात 91 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमती प्रति तोळा 47,195 रुपये इतकी झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये देखील सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. याठिकाणी सोन्याचे दरामध्ये 0.08 टक्क्याने वाढ झाली आङे. या वाढीनंतर सोन्याचे भाव 1,753.10 डॉलर प्रति औंस आहेत.

First published: June 2, 2020, 2:03 PM IST

ताज्या बातम्या