भारतापुढचं संकट वाढलं! आर्थिक दर शून्याखाली राहण्याचा अंदाज असल्यानं Moody's रेटिंग घटलं

भारतापुढचं संकट वाढलं! आर्थिक दर शून्याखाली राहण्याचा अंदाज असल्यानं Moody's रेटिंग घटलं

मूडीज इनव्हेस्टर्स सर्व्हिस (Moody's Investors Service) भारताचे सॉव्हरेन रेटिंग (India's Sovereign Ratings) कमी करत BAA3 केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जून : मूडीज इनव्हेस्टर्स सर्व्हिस (Moody's Investors Service) भारताचे सॉव्हरेन रेटिंग (India's Sovereign Ratings) कमी करत BAA3 केली आहे. त्याचप्रमाणे आउटलूकही नकारात्मक असल्याचे मूडीजकडून नमूद करण्यात आले आहे. मूडीजने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात त्यांनी ही बाब नमूद केली आहे. यामुळे भारत सरकारसमोरील आव्हान वाढले आहे. तसच मूडीजने असे म्हटले आहे की , देशाला कमी विकास दर आणि वाढणारी वित्तीय तूट या संकटांचा सामना करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी S&P आणि फिच रेटिंग्स (Fitch Ratings) ने देखील भारताचे रेटिंग्ज घटवले होते. मूडीजने त्यांच्या निवेदनात असे सांगितले आहे की, 'आम्ही भारताचे लोकल-करन्सी-सीनियर अनसिक्युअर्ड रेटिंग BAA2 वरून BAA3 करत आहोत. त्याचप्रमाणे कमी कालावधीसाठीच्या लोकल करन्सी रेटिंग देखील P-2 वरून P-3 केली आहेत'.

(हे वाचा-कोरोनाला हरवण्याचा उपाय मिळाला! रुग्णांना देणार अमेरिकेहून मागवलेले 'हे' औषध)

मूडीजच्या अहवालानुसार हे स्पष्ट होत आहे की, येणारा काळ देशातील नीती निर्माता संस्थांसाठी आव्हानात्मक (Policy making Institution) असणार आहे. योग्य पद्धतीने पावलं उचलत त्यांना भविष्यात काम करावे लागणार आहे. परिणामी या संकटातील जोखीम कमी होईल. नोव्हेंबर 2017 मध्ये भारताचे सॉव्हरेन रेटिंग (पतनामांकन) मूडीजने बीएए3 वरून बीएए2 वर वाढवले होते. अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे मत यावेळी मांडण्यात आले होते. तब्बल 13 वर्षांच्या कालावधीनंतर ही सुधारणा झाली होती. मात्र पुन्हा एकदा मूडीजने हे पतनामांकन कमी केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर येणाऱ्या संकटाची ही चाहूल आहे.

(हे वाचा-पहिल्यासारखा धोकादायक नाही राहिला कोरोनाव्हायरस? WHOनं दिले उत्तर)

रेटिंग कमी होण्याचे कोव्हिड-19 चे वाढलेल्या संक्रमणामुळे झालेले नुकसान हे एकमेव कारण नाही आहे, असे स्पष्टीकरण मूडीजने दिले आहे. कोव्हिड-19चे संक्रमण वाढण्याच्या आधीपासूनच ही परिस्थिती होती, तर या संकटामुळे भारतासमोरील जोखीम आणखी वाढली आहे, असे मूडीजने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे भारताला दीर्घ काळासाठी अर्थव्यवस्थेमध्ये सुस्त वाढ पाहायला मिळेल.

First published: June 2, 2020, 10:38 AM IST
Tags: GDP

ताज्या बातम्या