मुंबई, 10 जानेवारी : मुंबईत घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाने सर्वसामान्यांना नव्या घरांच्या लॉटरीबाबतची खुशखबर दिली आहे. जुलै महिन्यात 4 हजार घरांसाठी लॉटरी निघणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत 1BHK घरं उभारली जाणार आहेत. गोरेगाव येथे 22 लाखांत 1BHK घरं उपलब्ध होणार आहेत. म्हाडाच्या मुंबई विभागाकडून याबाबत तयारी सुरू करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये पहाडी गोरेगाव येथे अत्यल्प गटासाठी 1239 घरांचा समावेश असणार आहे. पहाडी गोरेगावमध्ये 23 मजली अशा सात इमारती उभारल्या जाणार आहेत. घराचं क्षेत्रफळ 322.60 चौरस फूट इतकं असेल. 22 लाखांत 1BHK घरं अत्यल्प गटासाठी असणार आहेत. इतर घरं उन्नत नगर येथे उभारण्यात येणार आहेत. पहाडी गोरेगाव भागात मध्यम उत्पन्न गटासाठी 227 घरं देण्यात येणार आहे. त्याचं क्षेत्रफळ 794.31 चौरस फूट असेल. मध्यम उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांची किंमत 56 लाख रुपये आहे.
हे वाचा - नवीन घर घ्यायचा विचार करताय? ‘ही’ कंपनी देतेय 6.46 टक्के व्याजदराने होम लोन
तर उच्च उत्पन्न गटासाठी 105 घरं उपलब्ध होणार आहे. या घरांचं क्षेत्रफळ 978.56 चौरस फूट असणार आहे. या घरांची किंमत 69 लाख रुपये असेल.
हे वाचा - Personal Loan : आर्थिक संकटात पर्सनल लोन कधीही योग्य; काय होतो फायदा?
पहाडी गोरेगावसह उन्नत नगर येथेही म्हाडा घरं उभारणार आहे. यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 708 घरं असणार आहे. अल्प गटासाठी 736 असतील. या घरांचं क्षेत्रफळ 482.98 चौरस फूट असून याची किंमत 30 लाख रुपये असेल.