मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत घर परवडेना ! Shiv Sena आमदाराने हक्काच्या घरासाठी केला MHADA कडे अर्ज

मुंबईत घर परवडेना ! Shiv Sena आमदाराने हक्काच्या घरासाठी केला MHADA कडे अर्ज

हक्काचं घर मिळवण्यासाठी चक्क शिवसेना आमदारानेच केला MHADA कडे अर्ज

हक्काचं घर मिळवण्यासाठी चक्क शिवसेना आमदारानेच केला MHADA कडे अर्ज

Shiv Sena MLA application for MHADA home: सत्ताधारी शिवसेनेच्या आमदाराने म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 8 ऑक्टोबर : मुंबई आणि आसपासच्या शहरांत आपलं हक्काचं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, घरांच्या किमती प्रचंड असल्याने सर्वसामान्यांना सहजासहजी महानगरात घर खरेदी करणं परवडत नाही. त्यामुळेच म्हाडा (MHADA) आणि सिडकोने (CIDCO) अल्प किमतीत नागरिकांना घर उपलब्ध करुन देण्याच्या योजना आणल्या. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आपल्या हक्काच्या घऱाचं स्वप्न पूर्ण करत आहेत. मात्र, मुंबईत घरांच्या किमती प्रचंड असल्याने केवळ सामान्य नागरिकच नाही तर सत्ताधारी शिवसेनेच्या आमदाराने म्हडाच्या घरांच्या लॉटरीसाठी (Shiv Sena MLA applies for MHADA Lottery 2021) अर्ज केला आहे. आश्चर्य वाटतंय ना? पण हे खरं आहे.

म्हाडाने आपल्या कोकण मंडळातून 8984 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीत शिवसेनेच्या एका आमदाराने घरासाठी अर्ज केला आहे. दोन योजनांमध्ये आमदाराने अर्ज केला आहे यामध्ये ठाण्यातील एका योजनेत तर दुसरा अर्ज हा नवी मुंबईतील घरासाठी केला आहे. हे आमदार आहेत पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे श्रीनिवास वनगा (Shiv Sena MLA Shrinivas Vanga). यासंदर्भातील वृत्त squarefeatindia.com ने दिलं आहे.

यासंदर्भात आमदार श्रीनिवास वनगा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्याचं कारण सांत त्यांनी म्हटलं, "मुंबईत आत्ता आमदार होस्टेल नाहीये. जेव्हा-जेव्हा मला मुंबईला यायचे असेल तेव्हा भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये रहावं लागतं. मुंबईतील अपार्टमेंटचे भाडे 1 लाख रुपयांपर्यंत जाते, जे परवडणारे नाहीये. त्यामुळे मुंबई जवळ घर शोधत आहे." असंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

आमदार श्रीनिवास वनगा म्हणाले, ते पालघर जिल्ह्यातील टोकाला म्हणजेच गुजरातच्या सीमेच्या जवळ राहतात आणि ठाण्यात पोहोचण्यासाठी जवळपास तीन तास लागतात. त्यामुळेच एक असे घर शोधत आहे जे मुंबईपासून जवळ असेल आणि मंत्रालय-विधानसभा गाठण्यासाठी सोपं होईल.

म्हाडाच्या घरांसाठीच्या लॉटरीत खासदार आणि आमदारांसाठी एक विशेष कोट्या अंतर्गत घरे राखीव आहेत. त्या अंतर्गतच आमदार श्रीनिवास वनगा यांनी घरासाठी अर्ज केला आहे. केवळ त्यांनीच नाही तर इतरही राजकीय मंडळीनी घरासाठी अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे. आमदार वनगा यांनी ज्या घरांसाठी अर्ज केला आहे त्यापैकी एक घर घणसोली येथे आहे. जे 41.93 स्क्वेअर मीटर असून त्याची किंमत 20.70 लाख रुपये इतकी आहे.

कुठल्या विभागात किती घरे?

कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत 8 हजार 984 घरांसाठी लॉटरी काढण्यात येत आहे. कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत 6 हजार 180 सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 624 सदनिका, खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 586 सदनिका, सर्व्हे क्रमांक 162 खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 2016 सदनिका, सर्व्हे क्रमांक 13 भंडारली (ता. जि. ठाणे) येथे 1769 सदनिका, गोठेघर (जि. ठाणे) येथे 1185 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

अत्यल्प उत्पन्न गटासाठी मिरारोड (ठाणे) 15 सदनिका सोडतीत आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथील 1 हजार 742 सदनिका, सर्व्हे क्रमांक 13 भंडारली (ता. जि. ठाणे) येथील 88 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथे 36 सदनिका, वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे 2 सदनिका, सर्व्हे क्रमांक 216 पीटी, 221 पीटी मिरा रोड (जि. ठाणे) येथे 196 सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी सर्व्हे क्रमांक 491, 23 पार्ट वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे 1 सदनिका सोडतीत आहे.

याशिवाय 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी चंदनसर (ता. वसई, जि. पालघर) येथे 8, वडवली (मोघरपाडा, ठाणे) येथे 76 सदनिका, मौजे कावेसर आनंद नगर (ता. जि. ठाणे) येथे 23 सदनिका, गाव वालिव (ता. वसई, जि. पालघर) 16 सदनिका, कोपरी (ता वसई, जि. पालघर) येथे 2 सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी कासारवडवली (ता. जि. ठाणे) येथे 16 सदनिका, मौजे वडवली (ता. जि. ठाणे) येथे 116 सदनिका, मोघरपाडा (ठाणे पश्चिम) येथे १ सदनिका, मौजे पारसिक नगर (ता. जि. ठाणे) येथे 35 सदनिका, मौजे डावले (ता. जि. ठाणे) येथे 28 सदनिका, मौजे कावेसर (ता. जि. ठाणे) येथे 140 सदनिका, बालकुंभ- ठाणे येथे 21 सदनिका, भाईंदरपाडा-ठाणे येथे 24 सदनिका, अगासन-ठाणे येथे 47 सदनिका, टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 62 सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर 11 येथे 40 सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर 8 येथे 51 सदनिका, मौजे वाळीव (ता. वसई, जि. पालघर) येथे 68 सदनिका, कोपरी (ता. वसई, जि. पालघर) येथे 20 सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

First published:

Tags: Mhada lottery, Shiv sena