जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Meesho IPO: फेसबुकची गुंतवणूक असलेली 'मीशो' IPO आणण्याच्या तयारीत, कधीपर्यंत येण्याची शक्यता

Meesho IPO: फेसबुकची गुंतवणूक असलेली 'मीशो' IPO आणण्याच्या तयारीत, कधीपर्यंत येण्याची शक्यता

Meesho IPO: फेसबुकची गुंतवणूक असलेली 'मीशो' IPO आणण्याच्या तयारीत, कधीपर्यंत येण्याची शक्यता

मीशो पुढील वर्षी जानेवारीपर्यंत इश्यूसाठी अर्ज सादर करण्याची शक्यता आहे. कंपनीचा इश्यू 2023 च्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता आहे, असे एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 मार्च : स्टार्टअप कंपनी मीशो (Meesho) या इश्यूद्वारे निधी उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीला Facebook ची मूळ कंपनी Meta Platforms आणि Softback Group च्या Vision Fund 2 द्वारे निधी दिला जातो. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मीशोचा आयपीओ (Meesho IPO) 2023 च्या सुरुवातीला येऊ शकतो. रॉयटर्सच्या अहवालानुसार, बंगळुरूमधील सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म 2022 च्या उत्तरार्धात किंवा 2023 च्या सुरुवातीला लिस्ट होऊ शकतो. कंपनी भारतीय आणि यूएस या दोन्ही बाजारपेठांमध्ये लिस्ट होण्याची शक्यता तपासत आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये, मीशोने सीरिज एफ फंडिंग फेरीत 57 कोटी डॉलर जमा केले. कंपनीने हे पैसे 4.9 अब्ज वॅल्युएशनवर उभे केले आहेत. फिडेलिटी मॅनेजमेंट अँड रिसर्च कंपनी आणि बी कॅपिटल ग्रुप यांच्या नेतृत्वाखाली मीशो यांनी हा निधी उभारला होता. Credit Card बिल थकवू नका, सिबिल स्कोअर वाईट असेल तर कसा कराल दुरुस्त? कंपनी काय करते? यूजर्स सप्लायर मार्केट प्लेसमधून खरेदी करुन आपल्या प्रॉफिट मार्जिनसह व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामद्वारे प्रोडक्ट्स विकू शकतात. मीशो पुढील वर्षी जानेवारीपर्यंत इश्यूसाठी अर्ज सादर करण्याची शक्यता आहे. कंपनीचा इश्यू 2023 च्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता आहे, असे एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. Home Loan ट्रान्सफर करुन EMI 5000 रुपयांनी कमी करा, संपूर्ण कॅलक्युलेशन समजून घ्या मात्र, या संदर्भात कंपनीला पाठवलेल्या ईमेलवर कोणताही प्रतिसाद आलेला नाही. Meesho ने नोव्हेंबर 2021 मध्ये JPMorgan Chase चे माजी गुंतवणूक बँकर धीरेश बन्सल यांना मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. सूत्रांनी सांगितले की बन्सल यांच्यावर स्टार्टअपच्या आयपीओपूर्वी बूक्सची दुरुस्ती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात