Home /News /money /

Credit Card बिल थकवू नका, सिबिल स्कोअर वाईट असेल तर कसा कराल दुरुस्त?

Credit Card बिल थकवू नका, सिबिल स्कोअर वाईट असेल तर कसा कराल दुरुस्त?

प्रत्येक कर्ज आणि बिलाची परतफेड करण्याची शेवटची तारीख अचूकपणे नोंदवा. यासह, तुम्ही निर्धारित वेळेपूर्वी बिल भरा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. यासोबतच तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही वाईट परिणाम होणार नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 मार्च : बँकेत कोणतंही कर्ज (Loan) घेताना सर्वात आधी बँक आपला क्रेडिट स्कोअर (Credit Score) तपासते. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर त्याचा आपल्या CIBIL स्कोअरवर खूप वाईट परिणाम होतो. आजच्या काळात क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड (Credit, Debit Card) इत्यादी आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग बनला आहे. बहुतेक कंपन्या आपल्या क्रेडिट कार्डसह अनेक आकर्षक ऑफर देतात, ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होतो. परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही, तर कंपनी तुमच्यावर प्रचंड दंड तर लावतेच, पण त्याचवेळी तुमच्या CIBIL स्कोअरवरही त्याचा खूप वाईट परिणाम होतो. तुमचा CIBIL स्कोर खराब असल्यास, तुम्हाला नंतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेताना खूप त्रास सहन करावा लागतो. जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिलही निर्धारित वेळेनंतर भरले असेल आणि त्यामुळे तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम झाला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी काय कराल याबद्दल माहिती घेऊया. Home Loan ट्रान्सफर करुन EMI 5000 रुपयांनी कमी करा, संपूर्ण कॅलक्युलेशन समजून घ्या तुमचा CIBIL स्कोर कसा दुरुस्त करायचा? वैयक्तिक कर्ज (Personal Loan), गृह कर्ज ( Home Loan), कार कर्ज (Car Loan), क्रेडिट कार्ड (Credit Card) इत्यादी कोणत्याही प्रकारचे कर्ज मोठ्या जबाबदारीने वापरा. तसेच वेळेवर पेमेंट करा. यामुळे तुमचा CIBIL स्कोअर खराब होत नाही आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री बरोबर राहतो. प्रत्येक कर्ज आणि बिलाची परतफेड करण्याची शेवटची तारीख अचूकपणे नोंदवा. यासह, तुम्ही निर्धारित वेळेपूर्वी बिल भरा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. यासोबतच तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही वाईट परिणाम होणार नाही. अनावश्यक खरेदी टाळा अतिरिक्त डिस्काउंट ऑफर विनाकारण पाहून अनेक लोक क्रेडिट कार्डने खरेदी सुरू करतात. त्यामुळे नंतर त्यांना बिल भरण्यात अडचण येते आणि त्यांच्यावर अधिक बिलांचा बोजा वाढू लागतो. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डने खरेदी विचारपूर्वक करावी. Russia-Ukraine युद्धाने शेअर बाजाराला हादरे, बाजार 12 सेशनमध्ये 4000 अंकांनी खाली किमान कर्ज घ्या जीवनात खर्च करण्यापूर्वी नेहमी बचतीचा विचार केला पाहिजे. यासोबतच तुमचा खर्च मर्यादेत ठेवा जेणेकरून भविष्यात तुमच्यावर कर्जाचा जास्त दबाव पडू नये. यासह कर्जाचा अर्ज जास्त कर्ज आणि खराब CIBIL स्कोअरमुळे रद्द होऊ शकतो. याचा क्रेडिट स्कोअरवरही नकारात्मक परिणाम होतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Credit card, Money

    पुढील बातम्या