Home /News /money /

Home Loan ट्रान्सफर करुन EMI 5000 रुपयांनी कमी करा, संपूर्ण कॅलक्युलेशन समजून घ्या

Home Loan ट्रान्सफर करुन EMI 5000 रुपयांनी कमी करा, संपूर्ण कॅलक्युलेशन समजून घ्या

तुम्हाला तुमच्या होम लोनचा EMI 5000 रुपयांनी कमी करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी काही नियोजन करावे लागेल. स्वस्त व्याजदरात बँक कर्ज हस्तांतरित केल्याने तुमच्या EMI वर मोठा फरक पडेल.

    मुंबई, 4 मार्च : जर तुम्ही गृहकर्जावर (Home Loan) जास्त व्याज देत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि माहिती घेऊन आलो आहोत. जे जाणून घेऊन तुम्ही तुमचा EMI 5000 रुपयांनी कमी करू शकता. काही वर्षांपूर्वी बहुतांश बँका 8 ते 9 टक्के दराने कर्ज देत होत्या पण आता बहुतांश बँका 7 टक्के दराने कर्ज देत आहेत. यासोबतच होम लोन ग्राहकांना अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे गृहकर्ज ट्रान्सफर (Home Loan Transfer) करू शकता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा पर्याय निवडून तुम्ही केवळ ईएमआयचा बोजा कमी करू शकत नाही तर परतफेडीचा कालावधीही वाढवू शकता. EMI 5000 रुपयांपर्यंत कमी होईल जर तुम्हाला तुमच्या होम लोनचा EMI 5000 रुपयांनी कमी करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी काही नियोजन करावे लागेल. स्वस्त व्याजदरात बँक कर्ज हस्तांतरित केल्याने तुमच्या EMI वर मोठा फरक पडेल. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 मध्ये गृहकर्ज घेतले असेल, तर त्या बँकेच्या गृहकर्जावरील व्याजदर 9.25 टक्के असेल. आता तुम्ही गृहकर्ज नवीन बँकेत शिफ्ट केल्यास ते 7 टक्के दराने घेऊ शकता, तर तुमचा मासिक ईएमआय आपोआप कमी होईल. Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर 15 रुपयांना वाढू शकतात, ऑईल कंपन्या सध्या मोठ्या तोट्यात संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घेऊया >> वर्ष 2016 >> कर्जाची रक्कम 30 लाख >> व्याज दर 9.25 टक्के >> कर्जाचा कालावधी 20 वर्षे >> EMI 27,476 रुपये आता समजा 2022 मध्ये तुम्ही तुमचे गृहकर्ज नवीन बँकेत शिफ्ट केले. त्यामुळे तुमच्या थकीत कर्जात 24 लाख रुपयांची बचत होईल. म्हणजेच, जर तुम्ही तुमचे गृहकर्ज अशा प्रकारे शिफ्ट केले तर तुमचा ईएमआय दरमहा सुमारे 5000 रुपयांनी कमी होऊ शकतो. Share Market Update : शेअर बाजारात घसरण सुरुच, Sensex 768 अंकांनी तर Nifty 252 अंकांनी खाली नवीन बँक ईएमआय कॅल्क्युलेशन >> वर्ष 2022 >> कर्जाची रक्कम 25 लाख >> व्याज दर 6.90 टक्के >> कर्जाचा कालावधी 14 वर्षे >> EMI 22,000 (अंदाजे) आवश्यक कागदपत्रे जर तुम्हाला गृहकर्जाची शिल्लक ट्रान्सफर करायची असेल, तर यासाठी KYC कागदपत्रे जसे की ओळख पुरावा आणि पत्ता पुरावा (ID and Address Proof) आवश्यक असेल. याशिवाय, स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाची मागील दोन वर्षांची आर्थिक विवरणपत्रे आणि पाच वर्षांच्या व्यवसायातील सातत्य कागदपत्रे द्यावी लागतील. पगारदार अर्जदारांनी चालू वेतन स्लिप आणि सहा महिन्यांचे बँक खाते विवरण देणे आवश्यक आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Home Loan, Money

    पुढील बातम्या