नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' (PM Narendra Modi Mann ki Baat) द्वारे जनतेशी संवाद साधला. आज या कार्यक्रमाचा हा 83 वा भाग आहे. हा विशेष कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केला जातो. पंतप्रधान या कार्यक्रमातून अनेक प्रेरणादायी कथा जनतेसमोर मांडतात. अशीच एक कथा आहे 'मयूर पाटील' (Mayur Patil) या तरुणाची आणि त्याच्या मित्रांची. आजच्या मन की बातमध्ये पंतप्रधानांनी मयूर पाटील याच्याशी संवाद साधला.
PM मोदींनी यावेळी देशभरात वेगाने वाढत असणाऱ्या स्टार्टअप युगाबाबत आनंद व्यक्त केला. 1 बिलियन डॉलरचे मूल्य असणाऱ्या युनिकॉर्नची संख्याही आज 2015 सालाच्या तुलनेत वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आजच्या तरुण पिढीचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले की, 'आमच्या तरुणांनी महामारीच्या काळातही असे यश मिळवले आहे. आता देशात 70 हून अधिक स्टार्टअप्स आहेत ज्यांचे मूल्य एक अब्जाहून अधिक आहे.'
हे वाचा-पेट्रोल भरण्याआधी जाणून घ्या काय आहे आजचा भाव, इंधनाचे नवे दर जारी
पीएम मोदी म्हणाले की, देशातील तरुण जागतिक समस्या सोडवण्यासाठी मदत करणारे स्टार्टअप तयार करत आहेत. त्यांनी प्रदूषणाच्या समस्येवर काम करणाऱ्या मयूर पाटील या तरुण उद्योजकाशी संवाद साधला. Small Spark Concepts नावाची मयूरची कंपनी आहे. कॉलेजमध्ये स्वत:च्या बाइकचं मायलेज वाढवण्यासाची त्याला सुचलेली कल्पना आज मोठ्या उपयोगाची ठरली आहे. मयूरने अशी एअर फिल्टर तंत्रज्ञान प्रणाली विकसीत केली आहे, ज्याद्वारे उत्सर्जन कमी करून वाहनांचे मायलेज वाढवता येईल. ही एअर फिल्टर टेक्नॉलॉजी 2017-18 मध्ये प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या दहा बसेसमध्ये देखील बसवण्यात आली आहे. यामुळे इंधन कार्यक्षमता 10% वाढली असून उत्सर्जन 40% कमी झाले.
PM @narendramodi interacts with young Mayur Patil who along with his friends have tried to put forward a solution to the problem of pollution.#MannKiBaat pic.twitter.com/RI5TRQMb6W
— DD News (@DDNewslive) November 28, 2021
हे वाचा-मोदी सरकार करत आहे स्वस्त सोन्याची विक्री, उद्यापासून मिळेल गुंतवणुकीची संधी
या कामासाठी मयूर आणि त्याच्या मित्रांना यावर्षी पेटंट मंजूर करण्यात आले आहे. त्याने आणि त्याच्या तीन मित्रांनी नीती आयोगाच्या अटल न्यू इंडिया चॅलेंजमध्ये भाग घेतला (Niti Aayog's Atal New India Challenge) आणि 90 लाखांचे अनुदान प्राप्त केले ज्यामुळे त्यांना या एअर फिल्टरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी कारखाना सुरू करता आला आहे. या प्रयोगानंतर खर्च किती वाचतो या प्रश्नाचे उत्तर देताना मयूर याने असे उत्तर दिले की, बाईकचे मायलेज जे 25 किमी प्रति लीटर असते ते ही प्रणाली वापरल्यानंतर 39 किमी प्रति लीटर होते. यामुळे 40टक्के कार्बन एमिशन कमी झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mann ki baat, PM narendra modi