मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Price Today: पेट्रोल भरण्याआधी जाणून घ्या काय आहे आजचा भाव, इंधनाचे नवे दर जारी

Petrol Price Today: पेट्रोल भरण्याआधी जाणून घ्या काय आहे आजचा भाव, इंधनाचे नवे दर जारी

गेला महिनाभर जवळपास पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर आहेत. आज रविवारी (28th November Petrol Price) देखील हिच परिस्थिती आहे. गेले 25 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर सारखेच आहेत.

गेला महिनाभर जवळपास पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर आहेत. आज रविवारी (28th November Petrol Price) देखील हिच परिस्थिती आहे. गेले 25 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर सारखेच आहेत.

गेला महिनाभर जवळपास पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर आहेत. आज रविवारी (28th November Petrol Price) देखील हिच परिस्थिती आहे. गेले 25 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर सारखेच आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: गेला महिनाभर जवळपास पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर आहेत. आज रविवारी (28th November Petrol Price) देखील हिच परिस्थिती आहे. गेले 25 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर सारखेच आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी जारी केलेल्या नव्या इंधनाच्या दरानुसार (Fuel Rate Today) आजही दर स्थिर आहेत. इंधनाच्या किमती जरी वाढत नसल्या तरी त्या कमी देखील होत नाही आहेत. मात्र काही शहरात पेट्रोल नव्वद रुपयांपेक्षाही कमी किमतीत प्रति लीटर मिळत आहे. मुंबईत एका लीटर पेट्रोलसाठी 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते आहे. गेल्या महिन्यात इंधन दराचा भडका उडाला होता, सातत्याने दर वाढत होते. या महिन्यात परिस्थिती वेगळी आहे.

आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. पोर्ट ब्लेअर याठिकाणी पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटरवर आहे.

हे वाचा-पुढील 2-3 महिन्यात चांगला रिटर्न देईल हा शेअर, काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

काय आहेत इंधनाचे दर (Petrol Diesel Price on 28th November 2021)

>> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर

>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

>> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर

>> पोर्ट ब्लेअर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर

हे वाचा-मोदी सरकार करत आहे स्वस्त सोन्याची विक्री, उद्यापासून मिळेल गुंतवणुकीची संधी

दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते

अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike