नवी दिल्ली, 13 जानेवारी : जेव्हा फक्त सिंगल LPG गॅस सिलेंडर (LPG gas cylinder) असतो आणि अचानक घरातील हा सिलेंडर संपतो तेव्हा गृहिणींसमोरील सर्वात मोठी अडचण येते. स्वयंपाक झालेला असेल तर ठिक आहे. पण त्याआधीच सिलेंडर संपला तर मग काही खरं नाही. बुकिंग केल्यानंतर सिलेंडर (LPG gas cylinder booking) घरी यायला किमान एक दिवस तरी जातो किंवा कधी कधी तर दोन-चार दिवस वाट पाहावी लागते. पण आता फक्त 30 मिनिटांत तुमच्या घरी सिलेंडर पोहोचणार नाही. कारण आता यासाठी तात्काळ सेवा मिळणार आहे.
सरकारी तेल कंपनी इंडिय ऑईल (IOC) तात्काळ LPG सेवा (Tatkal LPG Seva) सुरू करण्याची योजना आखतं आहे. ज्यामार्फत फक्त अर्ध्या तासात गॅस सिलेंडर तुमच्या घरी पोहोचेल. ज्या दिवशी तुम्ही सिलेंडर बुकिंग कराल त्यानंतर 30 मिनिटांत तुमच्या घरी येईल. सुरुवातीला प्रत्येक राज्यातील एका शहरास ही सुविधा दिली जाईल.
हे वाचा - Petrol Diesel Rates: पुण्यात सलग 3 दिवस पेट्रोल नव्वदीपार! मुंबईतही इंधनाचा भडका
बिझनेस स्टँडर्सच्या वृत्तानुसार, IOC प्रत्येक राज्यातील एक शहर किंवा जिल्हा निवडेल आणि तिथं ही सेवा सुरू करेल. या सेवेअंतर्गत फक्त 30 ते 45 मिनिटांत सिलेंडर पोहोचवला जाईल. सध्या यावर काम सुरू असून लवकरच ही सुविधा उपलब्ध करून देईल असं कंपनीनं सांगितलं आहे.
1 फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू करणार असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना काही पैसे मोजावे लागतील. Tatkal LPG किंवा single day delivery service साठी चार्ज लावण्याबाबच चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत ग्राहकांना सांगितलं जाईल, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
हे वाचा - अरे देवा! साबण, तेल, दंतमंजन आणि खाद्यतेलही महागलं; सामान्यांच्या बजेटवर परिणाम
IOC इंडेन ब्रांडनं ग्राहकांना सिलेंडर देतं. सध्या देशात 28 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. ज्यापैकी 14 कोटी ग्राहक इंडेन गॅसचा वापर करतात.